आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज चौथा दिवस आहे. रशियामध्ये युद्धाच्या विरोधात लोकांचे आंदोलन तीव्र झाले आहे. रशियाची राजधानी मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग आणि इतर शहरांमध्ये शनिवारी लोक रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी केली. यावेळी 460 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात मॉस्कोमधील 200 हून अधिक लोकांचा समावेश आहे.
रशियामध्ये युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करणारी खुली पत्रेही जारी करण्यात आली आहेत. 6,000 हून अधिक वैद्यकीय कर्मचारी, 3400 हून अधिक इंजीनियर आणि 500 शिक्षकांनी यावर साइन केले आहे. याशिवाय पत्रकार, लोकल बॉडी मेंबर्स आणि सेलिब्रिटींनीही अशाच प्रकारच्या याचिकांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
मॉस्कोचे गॅरेज म्यूझियम बंद
दुसरीकडे, मॉस्को येथील गॅरेज म्यूझियमने शनिवारी घोषणा केली की, जोपर्यंत यूक्रेनमध्ये हल्ला बंद होत नाही तोपर्यंत म्यूझियम बंद राहील. संग्रहालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आपण सामान्य असण्याचा गैरसमज पाळू शकत नाही.
780,000 लोकांनी ऑनलाइन याचिकेवर स्वाक्षरी केली
युक्रेनवरील हल्ला थांबवण्यासाठी गुरुवारी ऑनलाइन याचिका सुरू करण्यात आली. शनिवारी संध्याकाळपर्यंत 780,000 हून अधिक लोकांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. गेल्या काही वर्षांत रशियामधील सर्वाधिक समर्थित ऑनलाइन याचिकांपैकी ही याचिका एक असल्याचे मानले जाते.
कम्युनिस्ट पक्षाचे खासदार युद्धाच्या विरोधात
कम्युनिस्ट पक्षाच्या दोन खासदारांनीही युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. हे तेच खासदार आहेत, ज्यांनी काही दिवसांपूर्वी यूक्रेनमध्ये दोन फुटीरतावादी क्षेत्रांना मान्यता देण्यासाठी मतदान केले होते. खासदास ओलेग स्मोलिन यांनी म्हटले की, जेव्हा हल्ला सुरु झाला तेव्हा ते हैरान होते, कारण राजकारणात सैन्य बळाचा वापर अंतिम उपाय म्हणून केला गेला पाहिजे. दुसरे खासदार मिखाइल मतवेव यांनी म्हटले की, युद्ध त्वरित रोखले पाहिजे.
रशियाशिवाय जपान, हंगेरी, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांतील लोक युक्रेनवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहेत. 'युद्ध नको' अशा घोषणा असलेले पोस्टर घेऊन लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे हे युद्ध थांबवण्याची मागणी करत आहेत. रशियन पोलिसांनी डझनभर शहरांमध्ये युद्धाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या 1,700 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.