आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine War Putin Says US Dominance Is Over; British Prime Minister Johnson Arrives In Kiev | Marathi News

रशिया-युक्रेन युद्ध:पुतिन म्हणाले- अमेरिकेचे वर्चस्व संपले; ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन अचानक कीव्हमध्ये पोहोचले

मॉस्को/लंडन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे जगावरचे वर्चस्व आता कमी झाले असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी रशियाच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी त्यांच्या फायद्याचा आणि नुकसानीचा विचार करावा, असा सल्ला पुतीन यांनी दिला आहे. पुतिन म्हणाले- अमेरिका स्वत:ला मेसेंजर ऑफ लॉर्ड म्हणजेच देवाचा दूत मानते, परंतु वास्तव हे आहे की, ते आपल्या मित्र राष्ट्रांनाही गुलामांसारखे वागवते.

दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दुसऱ्यांदा कीव्हला पोहोचले. जॉन्सन यांनी येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली.

पुतिन यांचा अमेरिकेवर निशाणा
शुक्रवारी मॉस्कोमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पुतिन यांनी अमेरिकेवर निशाणा साधला. म्हणाले- अमेरिका आता पूर्वीसारखी ताकदवान राहिलेली नाही. दुःखाची गोष्ट ही आहे की तो आपल्या मित्रपक्षांनाही गुलामांप्रमाणे वागवतो. आता जगातील अमेरिकन वर्चस्व संपले आहे हे त्याच्या मित्रपक्षांनीही समजून घेतले पाहिजे. ते व्हायलाच हवे होते, कारण तुम्ही नेहमी दुसऱ्यांना दुबळे आणि गुलाम समजत असाल तर एक दिवस तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, पुतिन यांनी या कार्यक्रमात सुमारे 70 मिनिटे भाषण केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भाषणात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा एकदाही उल्लेख केला नाही. तथापि, रशियावरील आर्थिक निर्बंध आणि अर्थव्यवस्थेचा अनेक वेळा उल्लेख केला.

जॉन्सन अचानक कीव्हमध्ये
अलीकडेच, संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर बोरिस जॉन्सन पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. शुक्रवारी ते अचानक युक्रेनची राजधानी कीव्ह येथे पोहोचले. येथे त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर जॉन्सन दुसऱ्यांदा युक्रेनमध्ये पोहोचले आहेत. बोरिस यांनी झेलेन्स्की यांना आश्वासन दिले की, ब्रिटन आणि नाटो युक्रेनला सर्वतोपरी मदत करतील. ब्रिटीश आर्मी युक्रेनच्या दहा हजार सैनिकांना प्रशिक्षण देणार आहे. याशिवाय वैद्यकीय सुविधांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

रशियाविरुद्ध मोठ्या कारवाईची तयारी
पाश्चिमात्य देश कदाचित रशियाच्या विरोधात आणि युक्रेनच्या बाजूने मोठा निर्णय घेणार आहेत. किमान गुरुवार आणि शुक्रवारी मिळालेले सिग्नल या दिशेने निर्देश करत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी गुरुवारी युक्रेनची राजधानी कीव्ह येथे दाखल झाले. या सर्व नेत्यांनी सर्वप्रथम कीव्हच्या त्या भागांना भेट दिली, जिथे रशियाने जबरदस्त हल्ले सुरू केले आहेत. यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी दीर्घ भेट झाली. जॉन्सन काही तासांनंतर येथे पोहोचले. पाश्चिमात्य देश काही नवे नियोजन करत असल्याचे मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...