आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशिया आज आपला 77 वा विजय दिवस साजरा करत आहे. यादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की, पाश्चात्य देश क्रिमियासह रशियावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे युक्रेनवर हल्ला करणे आवश्यक झाले होते.
विजय दिनी लोकांना संबोधित करताना पुतीन म्हणाले - नाटोला आमच्या सीमेवर धोका निर्माण करायचा होता. रशियन सैन्य युक्रेनमध्ये आपल्या मातृभूमीचे रक्षण करत आहे. रशियन सैन्याने पाश्चात्य देशांच्या धोरणांवर वेळीच आणि आवश्यक जवाबी कारवाई केली आहे.
दुसरीकडे रशियावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिका, जी-7 देश आणि युरोपीय संघाने निर्बंधांची व्याप्ती वाढवली आहे. रशियन अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी, मॉस्कोमधून तेल आयातीवर बंदी घालण्यात आली. मात्र, यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
बायडेन यांनी झेलेंस्की यांना दिले मदतीचे आश्वासन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेंस्की यांना अधिक मदतीचे आश्वासन दिले. अमेरिकेने आतापर्यंत 2,600 हून अधिक रशियनांना व्हिसा नाकारला आहे. यासोबतच रशियाच्या तीन सरकारी वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कोणताही अमेरिकन नागरिक रशियन कंपन्यांना कोणत्याही प्रकारची सेवा देऊ शकणार नाही.
रशियाच्या प्रमुख बँका आणि वित्तीय संस्थांसह कोणत्याही प्रकारचे व्यवहार प्रतिबंधित केले जातील. रशियातून आयात होणारे लाकडाचे साहित्य, पंखे, व्हेंटिलेशन ऍक्सेसरीज आणि इतर अनेक इलेक्ट्रिकल वस्तू बंदी घालण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.