आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine War Russia Loses Rs 1.2 Lakh Crore Daily, Ukrainian Troops Beat Indian Students On Polish Border | Marathi News

रशिया-युक्रेन युद्ध:रशियाला रोज ‌‌‌1.2 लाख कोटी रुपयांचे नुकसान, पोलंड सीमेवर युक्रेनी सैन्याची भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

कीव्ह/माॅस्को5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लष्करी आघाडीवर मजबूत दिसत असलेला रशिया आर्थिक आघाडीवर अत्यंत धोकादायक स्थितीकडे वाटचाल करत आहे. रशियाला युक्रेनवर हल्ल्यासाठी फक्त ४ दिवसांत ५ लाख कोटी रु. खर्च करावे लागले. म्हणजे रोज सव्वा लाख कोटी रुपये. दुसरीकडे, युरोप आणि अमेरिकेच्या वेगवेगळ्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसण्यास सुरुवात झाली आहे. जागतिक ओळख बनवलेल्या रशियन कंपन्या चिंतित आहेत. रशियाच्या डीएनएस या प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह दमित्री अॅलेक्सयेव्ह म्हणाले,‘हे युद्ध आम्हाला मागे ढकलेल. युद्धाची काय गरज होती हे समजले नाही.’ उड्डाणांवर निर्बंध लादल्याने फटका बसलेल्या एस ७ या रशियाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या रशियन विमान कंपनीने म्हटले की, कंपनीची वाटचाल दिवाळखोरीकडे होऊ शकते. युद्ध दीर्घकाळ चालले तर एवढे प्रचंड नुकसान सहन कसे करायचे याची चिंता आता रशियाला आहे. त्यामुळे कीव्हवर त्वरित ताबा मिळवण्याची इच्छा आहे.

रशियाने खारकीव्हवरही हल्ला सुरू केला आहे. शहरात ५ ठिकाणी संघर्ष सुरू असल्याचा दावा खारकीव्हच्या महापौरांनी केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण तज्ज्ञांच्या मते, युद्ध एक महिनाही चालले तरी रशियाला फायदा खूप कमी आणि नुकसान जास्त होईल. कीव्ह आणि खारकीव्हमध्ये युक्रेनची आघाडी मजबूत राहावी यासाठी काही युरोपीय देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केला आहे. आता रशियाला जास्त दिवस युद्धात गुंतवून ठेवणे हे युरोपचे उद्दिष्ट आहे. दुसरीकडे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रविवारी बदललेली स्थिती पाहून राखीव दलांना सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे.

कीव्हनंतर खारकीव्हमध्ये घुसले रशियन सैनिक
२ शहरांच्या रस्त्यांवर संघर्ष रस्त्यांवर खुले युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंचे १००० पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे.
रशियाचे ३ ठिकाणी मोठे हल्ले क्षेपणास्त्र हल्ले वाढले. १.५ लाख रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसले. युक्रेनचे प्रमुख गॅस स्टेशन नष्ट.
न्यूक्लिअर डिटरंट फोर्स अलर्ट पुतीन यांनी न्यूक्लिअर डिटरंट फोर्सला अलर्ट राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे मानवी आपत्तीची शक्यता वाढली आहे.

पोलंड सीमेवर युक्रेनी सैन्याची भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण
युक्रेनहून भारतात येण्यासाठी पोलंडच्या दिशेने निघालेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रविवारी मारहाण करण्यात आली. युक्रेनच्या लष्कराने भारतीय विद्यार्थ्यांना बराच काळ सीमेवर बसवून ठेवले. घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला. केरळच्या एका विद्यार्थिनीने या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून कुटुंबाला पाठवला आहे. भारतीय विद्यार्थी आपला देश सोडून जात असल्याचा राग युक्रेनच्या सैनिकांना होता. दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. रविवारी ११३७ विद्यार्थी परतले.

रशियन चलन रुबलची या महिन्यात १०%पर्यंत झाली घसरण
पाश्चिमात्य देशांनी रशियाशी डॉलर-युरो-पौंडात व्यवसाय बंद केला आहे. त्यामुळे रुबलची आणखी घसरण होऊ शकते. ते पाहता भारतानेही रशियाला रुपयांत व्यवसाय करण्याचा प्रस्ताव पाठवण्याची तयारी केली आहे.

रशियन शेअर बाजार ४०% घसरले, युरोपचे रिकव्हर झाले
युद्ध सुरू होण्याच्या तीन आठवडे आधीपासूनच रशियन कंपन्यांना फटका बसणे सुरू झाले होते. तेथील शेअर बाजारात १० फेब्रुवारीनंतर ४०% पर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे तेथील लिस्टेड कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...