आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेन युद्धात रशियाकडून थंडीचा शस्त्रासारखा वापर:हिटलर-नेपोलियन थंडीमुळे जिंकलेले युद्ध हरले, अणु हल्ल्यापासून वाचले कोकूरा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

28 नोव्हेंबर 2022 रोजी रोमानियाच्या बुखारेस्ट शहरात नाटोच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर रशियावर युक्रेन युद्धात हिवाळ्याचा शस्त्रासारखा वापर करण्याचा गंभीर आरोप केला.

रशिया थांबला नाही तर युक्रेनची स्थिती अधिकच वाईट होईल, असा इशारा नाटोच्या सरचिटणीसांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे एखाद्या देशाने हवामानाचा युद्धात अशा प्रकारचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. नेपोलियनपासून हिटलपर्यंत अनेकांनी आपल्या शत्रूंना नामोहरण केले. पण त्यांना थंडीपुढे गुडघे टेकावे लागले.

या स्टोरीद्वारे आपण पाहूया की, रशिया हिवाळ्याचा वापर करून कसे उद्ध्वस्त करू शकतो? हवामानाचा युद्धावर कसा परिणाम पडतो? युद्धाच्या मैदानातील त्या कथा ज्यात हवामानाने निकाल बदलला याची विस्तृत माहिती.

हिवाळ्यात वाढणार युक्रेनच्या अडचणी

युक्रेनमध्ये तापमान घसरणार तसे युद्धाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांच्या यातना वाढतील. याचे कारण म्हणजे रशियाकडून होणारे क्षेपणास्त्र हल्ला. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, मागील आठवड्यात राजधानी कीव्हमधील 70% भागात वीज व पाण्याचा पुरवठा झाला नाही.

अमेरिकन गुप्तहेर यंत्रणेच्या माहितीनुसार, हिवाळ्याच्या महिन्यात युक्रेन युद्धाचा वेग मंदावेल. पण युक्रेनने रशिया आपल्यावरील हवाई हल्ल्यांत वाढ करेल अशी भीती व्यक्त केली आहे. युक्रेनच्या सदर्न डिफेंस फोर्सेसच्या प्रवक्त्या नाटालिया गुमनेयुक म्हणाल्या की, रशिया मागील आठवड्यासारखे युक्रेनवर एका मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्याची तयारी करत आहे.

काही दिवसांपूर्वी ऊर्जा पुरवठ्यावर झालेल्या हल्ल्यातून युक्रेन अजून सावरला नाही. त्यामुळे रशियाने भविष्यातही असे केले, तर तेथील जनजिवन अजून विस्कळीत होईल. त्याचा फायदा घेऊन रशियन लष्कर पुढे सरकेल.

आता वाचा जगातील 4 रोचक किस्से...

कडाक्याच्या थंडीमुळे नेपोलियनवर जिंकलेला रशिया सोडून देण्याची वेळ आली होती. (फोटो क्रेडिट-BBC)
कडाक्याच्या थंडीमुळे नेपोलियनवर जिंकलेला रशिया सोडून देण्याची वेळ आली होती. (फोटो क्रेडिट-BBC)

210 वर्षांपूर्वी नेपोलियनने जिंकलेला रशिया सोडला

आजपासून 210 वर्षांपूर्वी म्हणजे 1812 ची गोष्ट आहे. फ्रांसच्या लष्कराचे कमांडर नेपोलियन यांनी आपले साम्राज्य पूर्वेला रशियाच्या बाजूने पसरवण्याचा निर्णय घेतला. ही कामगिरी फत्ते करण्यासाठी त्याने 5 लाख सैनिकांचे एक मजबूत सेना तयार केली. यात अनेक देशांचे सैनिक सहभागी झाले. ते यूरोपची नेमान नदी ओलाडून त्यावेळच्या रशियात व आजच्या पोलँडमध्ये शिरले.

युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी नेपोलियनला तेथील धोकादायक रस्ते व प्राणघातक हिवाळ्याचा इशारा देण्यात आला होता. पण रशिया जिंकण्याच्या नादात नेपोलियनने याकडे दुर्लक्ष केले. त्याने आपल्या सर्वच सल्लागारांना हिवाळ्यापूर्वी आपली ग्रँड आर्मी युद्ध संपवून माघारी फिरेल असे आश्वासन दिले. पण त्याचा अंदाज चुकला.

नेपोलियनच्या विशाल लष्कराशी दोनहात करण्यापेक्षा रशियाने दोनहात मागे जाणे पसंत केले. परिणामी ग्रँड आर्मी रशियाच्या खूप आत शिरली. पण कालांतराने हिवाळ्याने आपले रौद्र रुप धारण केले. नेपोलियनच्या सैनिकांची रसद संपुष्टात आली. खराब रस्त्यांमुळे त्यांना आपली पुरवठा साखली चांगली राखता आली नाही. यामुळे त्यांच्यापर्यंत वेळेवर भोजन पोहोचले नाही. एवढेच नाही तर त्यांच्याकडे थंडीपासून बचाव करणारे उबदार कपडेही नव्हते.

सप्टेंबरचा महिना येता-येता नेपोलियन कसेतरी मॉस्कोपर्यंत पोहोचला. पण तोपर्यंत त्याच्याकडे एक चतुर्थांश सैनिकच शिल्लक राहिले होते. नेपोलियनने 5 आठवड्यांपर्यंत रक्त गोठवणाऱ्या थंडीत रशियाच्या शांतता प्रस्तावाची प्रतिक्षा केली. पण तो कधीच आला नाही. परिणामी, 4 डिसेंबर रोजी त्याला आपले आजारी व कुपोषित सैनिक घेऊन जिंकलेला रशिया मागे सोडून परत फ्रांसच्या दिशेने परत फिरावे लागले.

नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यापूर्वीचे छायाचित्र.
नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यापूर्वीचे छायाचित्र.

हवामानामुळे कोकूराऐवजी नागासाकीवर पडला अणुबॉम्ब

दुसऱ्या महायुद्धात 1945 मध्ये अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यात जपानच्या एका शहराला नशिबाने साथ दिली. सुरुवातीला अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व कोकूरा शहरावर अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला होता. प्लॅननुसार, 6 ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला.

आता नंबर कोकूराचा होता. 9 ऑगस्ट रोजी कोकूरावर अणुबॉम्ब टाकण्यासाठी तिनियान आयलँडवरून विशेष मोहीम-16 ची प्रक्रिया सुरू झाली. जे विमान हे बॉम्ब टाकणार होते, त्याला बॉक्सकार नाव देण्यात आले. त्याची जबाबदारी मेजर चार्ल्स स्वीनेला मिळाली. त्यांना बॉम्ब टाकण्यासाठी रडारचा वापर न करण्याची व स्वतः पाहून टार्गेटवर बॉम्ब टाकण्याचे विशेष आदेश देण्यात आले होते.

आदेशानुसार, विमान बॉम्ब घेऊन कोकूराला पोहोचले. पण त्यावेळी तिथे ढगांची गर्दी होती. आसपास सुरू असणाऱ्या गोळीबारामुळे सर्वत्र धूरही पसरला होता. हवामान बदलण्यासाठी त्याने 45 मिनिटे वाट पाहिली. पण काहीच बदलले नाही.

त्यानंतर कॅप्टन स्वीने यांनी कोकूरा सोडून दुसऱ्या टार्गेटकडे वळण्याचा निर्णय घेतला. हे टार्गेट जपानचे नागासाकी शहर होते. प्रारंभी नागासाकीवर ढगांचे सावट होते. पण अचानक सकाळी 11 च्या सुमारास वातावरण स्वच्छ झाले. त्यानंतर 45 सेकंदांनी नागासाकीवर बॉम्ब टाकण्यात आला. अशा प्रकारे खराब हवामानामुळे कोकूरा शहरातील 1,30,000 जणांचे प्राण वाचले.

रशियाकडून पराभूत झालेल्या नाझी सैनिकांची स्मशानभूमी. रशियाविरोधातील युद्धात जर्मनीच्या जवळपास 2 लाख सैनिकांचा बळी गेला होता. (फोटो- इम्पीरियल वॉर म्यूझियम)
रशियाकडून पराभूत झालेल्या नाझी सैनिकांची स्मशानभूमी. रशियाविरोधातील युद्धात जर्मनीच्या जवळपास 2 लाख सैनिकांचा बळी गेला होता. (फोटो- इम्पीरियल वॉर म्यूझियम)

हिवाळ्यात सोव्हियत रशियावर हिटलरचा हल्ला

हिवाळ्यामुळे नेपोलियन युद्ध हरल्याच्या बरोबर 129 वर्षांनंतरची गोष्ट आहे. जून 1941 मध्ये यूरोपचा मोठा भूभाग जिंकल्यानंतर हिटलरची जर्मन सेना सोव्हियत रशियाच्या दिशेने वळली. लक्षावधी सैनिकानी सोव्हियत रशियाचा एक भाग असणारे युक्रेन जिंकले. त्यानंतर नाझी सैनिक सप्टेंबर महिन्यात मॉस्को जिंकण्यासाठी पुढे सरकले. यावेळी मॉस्को व त्याच्या आसपासच्या भागात कडाक्याची थंडी पडली होती.

त्यामुळे थंडीची तयारी न करता युद्ध करण्यासाठी पोहोचलेल्या हिटलरच्या सैनिकांचे मोठे हाल सुरू झाले. ऑक्टोबरच्या प्रारंभी दाट धुके व बर्फवृष्टीमुळे सोव्हिय रशियाच्या रस्त्यांवर चिखल साचला.

जर्मन लष्कराच्या 10 पैकी केवळ एकच रणगाडा चांगला राहिला. उर्वरित सर्वच खराब झाले. हिटलरच्या लष्कराने थंडीमुळे युद्ध 2 आठवडे थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा नाझी लष्कराने मॉस्कोच्या दिशेने आगेकूच केली. पण 9 मैल अंतरावर अचानक तापमान -34 डिग्रीपर्यंत घसरले.

या थंडीसोबत सोव्हियत रशियाच्या लष्कराने जर्मन सैनिकांवर जोरदार पलटवार केला. थंडीमुळे लकवाग्रस्त झालेल्या नाझी सैनिकांना गोळीबारही करता येत नव्हता. बर्फामुळे त्यांचे सर्व शस्त्र निकामी झाले होते. त्यामुळे अवघ्या काही अंतरावर असतानाही नाझी सैनिकांना कडाक्याच्या थंडीमुळे मॉस्कोवर कब्जा करता आला नाही. त्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले.

बल्जच्या युद्धावेळी जर्मन सैनिक. (फोटो- नॅशनल वॉर म्यूझियम)
बल्जच्या युद्धावेळी जर्मन सैनिक. (फोटो- नॅशनल वॉर म्यूझियम)

1944 मध्ये युरोपात अडकले होते शक्तिशाली जर्मन सैन्य

16 डिसेंबर 1944 ची गोष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या लष्कराने बेल्जियम व लक्झमबर्गमधील अर्देंनेस क्षेत्रावर हल्ला केला. हा भाग मित्र देशांच्या मुख्य पुरवठा साखळीचा भाग होता.

यामुळे त्यावर ताबा मिळवताच अमेरिका व युरोपियन देश आपल्यापुढे गुडघे टेकतील असा हिटलरचा अंदाज होता. नाझी हल्ल्यावेळी हवामान खराब असल्यामुळे अमेरिका व युरोपियन देशांच्या हवाई दलांना हल्ले करता येत नव्हते. यामुळे नाझी सैनिक वरचढ ठरले.

अर्देंनेसच्या एका मोठ्या भागावर जर्मनीने कब्जा केला. पण ते युरोपियन देशांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचा सामना अमेरिकन लष्कराशी झाला. 8 दिवस दोन्ही देशांत घनघोर युद्ध झाले. जर्मन लष्कराने निकराने मारा केला. पण त्यांना पुढे जाता आले नाही.

तेव्हा 24 डिसेंबर रोजी अचानक हवामान स्वच्छ झाले. अमेरिका व युरोपियन देशांच्या एअरफोर्सने जोरदार हवाई हल्ले सुरू केले. थंडीमुळे थकलेल्या जर्मन लष्करासाठी आता या हल्ल्यांचा सामना करणे अवघड झाले होते. त्यांना मित्र देशांपुढे गुडघे टेकावे लागले. अशा प्रकारे पुन्हा एकदा युद्धात हवामानाने महत्त्वाची भूमिका निभावली.

रशिया-युक्रेन युद्धात बदलत्या हवामानाचा कोणता परिणाम होईल?

अमेरिकेच्या इंस्टीट्युट फॉर द स्टडी ऑफ वॉर अर्थात ISW नामक थिंकटँकच्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे काही काळ युद्ध मंदावण्याची शक्यता असली तरी युक्रेनचे सैन्य रशियाला पळवून लावण्याचे काम सुरू ठेवेल.

ISW च्या मते, येत्या काही दिवसांत युक्रेनच्या तापमानात आणखी घट होील. यामुळे सध्या पडणारा बर्फ गोठेल. एकदा बर्फ गोठण्यास सुरुवात झाली की, तो मूव्हमेंट करण्यालायक होईल. त्यानंतर युद्ध पुन्हा वेग पकडेल. त्याचा कोणत्या देशाला फायदा होईल हे आताच सांगता येणार नाही. पण थिंकटँकने या स्थितीत रशियाचे नुकसान होण्याचा दावा केला आहे.

द गार्डियनच्या वृत्तानुसार, रशियाच्या सैनिकांवर कडाक्याच्या थंडीत पातळ टेंटमध्ये राहण्याची वेळ आली आहे. यामुळे अनेकजण आजारी पडण्याची व शहीद होण्याची भीती आहे. युद्ध काही काळासाठी थांबले तर रशियाला आपल्या 3 लाख सैनिकांना मोबिलाइज करण्याची संधी मिळेल. तसेच त्याला आपला क्षेपणास्त्र साठाही वाढवता येईल.

युक्रेनला थंडीचा फायदा मिळेल?

युक्रेनचा सध्याची स्थिती अबाधित राखण्याचा प्रयत्न आहे. युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा व डिफेंस काउंसिलच्या प्रमुखांनी द गार्डियनला सागितले की, आमच्यासाठी थंडीचा कोणताही मुद्दा नाही. आम्ही असेच पुढे मार्गक्रमण करणार.

तसेच पाश्चिमात्य देशांकडून आवश्यक हवाई सुरक्षा मिळाली तर युक्रेन रशियन क्षेपणास्त्रांनाही सहजपणे उद्ध्वस्त करेल. रशियन हल्ल्याचा सामना करण्यासाठी अमेरिका युक्रेनची मदत करत आहे. अमेरिकाही युक्रेनसाठी शक्य तेवढी शस्त्रसामग्री गोळा करत आहे.

यात S-300 क्षेपणास्त्र यंत्रणा. T-72 रणगाडे व रशियाच्या स्पेशल आर्टिलरी शेल्सचा समावेश आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, युक्रेनची मदत करण्यासाठी अनेक नाटो देसांनी झेक रिपब्लिक, स्लोव्हेकिया व बुल्गेरियातील सोव्हियत काळातील आपले शस्त्र कारखाने पुन्हा सुरू करण्याच्याही विचारात आहेत.

सियाचिनमध्ये भारताने केला होता पराक्रम

संरक्षण तज्ज्ञ मनोज जोशी यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, हिवाळा असो वा उन्हाळा हवामानाचा युद्ध व मिलिट्रीच्या मूव्हमेंटवर नेहमीच परिणाम होतो. कडाक्याच्या थंडीमुळे मशीनरी व शस्त्रांतील लुब्रिकेंट्स गोठण्यास सुरुवात होते. सैनिकांच्या हालचालींवरही निर्बंध येतात. भारताने सियाचिन ग्लेशियरवर सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. सपाट भागात हेलिकॉप्टरमधून एकाचवेळी 25 सैनिक नेता येतात. पण सियाचिन सारख्या उंच भागात केवळ 5-6 सैनिकच नेता येतात. जोशींनी युक्रेन व रशिया या दोन्ही देशांचे सैनिक कडाक्याच्या थंडीत युद्ध करण्यासाठी तरबेज असल्याचाही दावा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...