आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine War Situation Updates| Russia Attack Donbass In Eastern Ukrain| Volodymyr Zelenskyy Met With Poland President Andrzej Duda

रशिया-युक्रेन युद्ध अपडेट्स:​​​​​​​रशियाने डोनबासवर हल्ले केले तीव्र; झेलेंस्की म्हणाले - युद्धाचा परिणाम युक्रेनचे भविष्य ठरवेल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

24 फेब्रुवारीपासून सुरू झालेले रु-युक्रेन युद्ध सुरूच आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेंस्की सतत त्यांच्या बाजूने पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी, झेलेंस्की यांनी युक्रेन दौऱ्यावर आलेले पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज डुडा यांची भेट घेतली. दरम्यान, रशियाने रविवारी पूर्व युक्रेनमधील डॉनबासवर हल्ले तीव्र केले.

इकडे, एक युक्रेन अधिकारी आणि रशियन वृत्तसंस्थेने सांगितले की, युक्रेनमध्ये तैनात असलेला रशियन अधिकारी आंद्रेई शेवचिक रविवारी झालेल्या हल्ल्यात जखमी झाला. आंद्रेई यांची युक्रेनियन शहर एनरहोदरचा महापौर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

डॉनबासमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे
झेलेंस्की यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. ज्यामध्ये त्यांनी डॉनबासची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, या कठीण काळातही आमचे सैनिक धैर्याने लढत आहेत आणि रशियन सैनिकांशी मुकाबला करत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, ''आम्ही त्या दिवसासाठी लढत आहोत जो आमचा विजय दिवस असेल"

रशियाने अमेरिकेच्या 963 लोकांच्या प्रवासावर बंदी घातली आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला 40 अब्ज डॉलर (सुमारे 3.11 लाख कोटी रुपये) मदत जाहीर केल्यानंतर रशियाने आपली भूमिका घट्ट केली आहे. आता रशियाने अमेरिकेतील 963 लोकांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. हे सर्व लोक आता रशियात येऊ शकत नाहीत. रशियाने यासंदर्भातील यादी जारी केली आहे.

त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस, परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन, पेंटागॉन लॉयड ऑस्टिन आणि सीआयए प्रमुख विल्यम बर्न्स यांचीही नावे आहेत. या यादीत अभिनेता फ्रीमनच्या नावाचाही समावेश आहे.

युक्रेनने मार्शल लॉ तीन महिन्यांसाठी वाढवला
युक्रेनने रविवारी मार्शल लॉ तीन महिन्यांसाठी वाढवला. आता ते 23 एप्रिलपर्यंत चालणार आहे. युक्रेनच्या संसदेने रविवारी मार्शल लॉच्या तिसऱ्या विस्तारासाठी पूर्ण बहुमताने मतदान केले, कारण रशियाने पूर्वेकडील डॉनबास प्रदेशाकडे आपले लक्ष वळवले आहे.

रशियन सैनिकांनी मुलींवर बलात्कार केला, एकाचा मृत्यू झाला
युक्रेनच्या पूर्वेकडील खार्किव शहराभोवती रशियन सैन्याने शहरे आणि गावांवर कब्जा केला असताना बालकांसोबत बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. रशियन सैनिकांवर हे आरोप लावण्यात आले आहेत. एका वर्षाच्या चिमुरडीवरही बलात्कार झाला होता, त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनियन पत्रकार इरिना मतवियिशिन यांच्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे.

युक्रेनच्या पत्रकाराने आपल्या अहवालात सांगितले की, सैनिकांनी मुलांच्या आईसमोर नऊ वर्षांच्या ट्रिपलेट (तीन मुले एकत्र जन्मलेले) आणि दोन 10 वर्षांच्या मुलींवर बलात्कार केला. हा अहवाल युक्रेनच्या संसदेच्या मानवाधिकार आयुक्त ल्युडमिला डेनिसोवा यांनी देखील शेअर केला होता.

बातम्या आणखी आहेत...