आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात तैवानचे तरुणही युक्रेनला साथ देत आहेत. तैवानमधील अनेक युवक युक्रेनच्या सैनिकांसोबत केवळ युद्धच लढत नाहीत, तर आपल्या देशापासून 8,444 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या देशासाठी आपल्या प्राणांची आहुतीही देत आहेत. शहीद होवू लागले आहेत.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, युद्धाच्या सुरुवातीपासून हजारो परदेशी युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी तेथे पोहोचले आहेत. यामध्ये 10 तैवानी युवकांचा देखील समावेश आहे. त्यापैकी एक असलेल्या तरूण शेंग गुआंग हा तरूण गेल्या महिन्यातच रशियन हल्ल्यात ठार झाला आहे. शेंगच्या मृत्यूनंतर जारी केलेल्या निवेदनात तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांनी युक्रेनच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. बीबीसीशी बोलताना शहीद झालेल्या शेंगच्या आईने सांगितले की, तो एक धाडसी मुलगा म्हणून कायम लक्षात राहील.
तैवानची मुले युक्रेनच्या सैन्यात का भरती होत आहेत
बीबीसीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, तैवानमध्ये राहणाऱ्या लोकांना युक्रेनची स्थिती त्यांच्यासारखीच वाटते. रशियाने युक्रेनमध्ये ज्या प्रकारे घुसखोरी केली आहे, त्यावर तैवानचे लोक आणि तेथील सरकारचे मत आहे की, चीनही त्यांच्यावर अशाच प्रकारचा हल्ला करणे सुरू केला आहे. एव्हाना भविष्यात हा हल्ला मोठ्या स्वरूपात देखील असू शकतो. म्हणूनच युक्रेनशी बंधुभाव राखण्यासाठी तैवानमधील तरूण रशियाशी युद्ध लढत आहेत.
झेलेन्स्की यांच्या आव्हानाला दिली साद
तैवानमध्ये सैन्यात सेवा करणे अनिवार्य आहे, म्हणूनच युक्रेनने तेथील लोकांना आपल्या सैन्यात समाविष्ट केले आहे. युक्रेनमधील 28 वर्षीय तैवानी सैनिक जॅक याओ याने बीबीसीला बोलताना सांगितले. तो म्हणाला की, झेलेन्स्कीच्या आवाहनानंतर तो युक्रेनियन सैन्यात सामील झाला. खरं तर, युद्ध सुरू झाल्यानंतर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी इतर देशांतील लोकांना सैनिक होण्यास सांगितले होते. त्यानंतर जगभरातून अनेक लोक युक्रेनच्या सैन्यात सामील झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.