आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन हल्ल्याचा दुसरा दिवस:पुतिन म्हणाले- युक्रेन वाचवायचे असेल, तर लष्कराने तेथील सत्ता हातात घ्यावी; कीव्ह लवकरच रशियन सैन्याच्या ताब्यात!

मॉस्को6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. राजधानी कीव्हमध्ये सकाळी 7 मोठे स्फोट झाले. लोक रात्रभर घरे, भुयारी मार्ग आणि भूमिगत आश्रयस्थानांमध्ये लपले. खाण्यापिण्यापासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा आहे.

युद्धाच्या दरम्यान, प्रथमच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्राला संबोधित केले. म्हणाले- आमची रणनीती अगदी स्पष्ट आहे आणि हेतूही. आम्हाला युक्रेनवर कब्जा करायचा नाही. त्यामुळे युक्रेनच्या सैन्याने तात्काळ आत्मसमर्पण करावे. युक्रेनमधील सर्व लोकांना तेथील सरकारने ओलीस ठेवले आहे. वोल्दोमिर जेलेंस्की सरकार ड्रग व्यसनी टोळी आहे. युक्रेनच्या लष्कराने तेथील सरकार उलथवून टाकून सत्ता आपल्या हातात घ्यावी.

दरम्यान, व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये वेगाने पुढे जात आहेत ते राजधानी कीव्ह कधीही काबीज करतील. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पेंटागॉन आणि व्हाईट हाऊसची एक विशेष टीम प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून आहे.

रोमानिया जहाजावर हल्ला!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने काळ्या समुद्रात रोमानियन जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यात आग लागली आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, रोमानिया हा नाटोचा सदस्य आहे आणि युक्रेन नाटोचा सदस्य नाही असे म्हणत नाटोने अद्याप रशियाविरुद्धच्या युद्धात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे आम्ही त्याला थेट लष्करी मदत देऊ शकत नाही.

रशियाला भारताकडून आशा
पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर शुक्रवारी रशियाकडून एक निवेदन आले. त्यात म्हटले आहे- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारत आम्हाला पाठिंबा देईल अशी आम्हाला आशा आहे. येथे कोणताही ठराव जारी झाल्यास आम्हाला भारताकडून पाठिंबा आणि सहकार्य अपेक्षित आहे.

शुक्रवारी युक्रेनच्या लष्करी भर्ती कार्यालयात उपस्थित सामान्य नागरिक. आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी ते येथे आले होते.
शुक्रवारी युक्रेनच्या लष्करी भर्ती कार्यालयात उपस्थित सामान्य नागरिक. आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी ते येथे आले होते.

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात वाढले रेडिएशन
गुरुवारी रात्री रशियन सैन्याने युक्रेनच्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हल्ले केले. येथे अनेक स्फोटही झाले. त्यामुळे या अणुप्रकल्पातील किरणोत्सर्गाची पातळी वाढली आहे. युक्रेनच्या न्यूक्लियर एजन्सीने याला दुजोरा दिला आहे. किरणोत्सर्गाच्या वाढत्या पातळीमुळे या भागात राहणाऱ्या हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यांना आरोग्याच्या समस्या देखील असू शकतात. दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने नागरिकांना रशियाच्या लष्करी हालचालींची माहिती ठेवण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकले.

कीव्हमध्ये सकाळपासून सात मोठे स्फोट

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये सकाळपासून सात मोठे स्फोट झाले आहेत. शहरावर एकामागून एक क्षेपणास्त्रे हल्ले होत असून लोक घरात लपून बसले आहेत. येथील महापौरांनी लोकांना घरातच थांबण्यास सांगितले आहे. युक्रेनने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. 30 रशियन रणगाडे आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली आहेत.

या फोटोमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की रशियन क्षेपणास्त्रांचा कीव्हवर पाऊस पडला.
या फोटोमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की रशियन क्षेपणास्त्रांचा कीव्हवर पाऊस पडला.

दरम्यान, रशियाचे सैन्य राजधानीत घुसल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियन रणगाडे येथून फक्त 32 किमी अंतरावर असून त्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने तीन पूल उडवून दिले आहेत. येत्या 96 तासांत म्हणजेच 4 दिवसांत कीव्ह रशियाच्या ताब्यात जाईल, अशी भीती झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की रशियन सैन्याने निवासी भागांना लक्ष्य केले असून त्यांनी रशियन नागरिकांना या युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.

शुक्रवारी सकाळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही एक निवेदन जारी केले. ते म्हणाले की, जगाने आपल्याला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले आहे. त्यांनी सांगितले की, ते कीव्हमध्ये आहेत आणि रशियन सैन्य तेथे दाखल झाले आहे. रशियाचे टार्गेट त्यांचे कुटुंब असल्याचेही त्यांनी सांगितले.

युक्रेनचे संपूर्ण सैन्य युद्धात उतरले
युक्रेन सरकारने 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. युक्रेनने आपल्या 10,000 नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी कीव्हवर झालेल्या हल्ल्याचा हा फोटो युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेर्शेंको यांनी शेअर केला आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर स्फोट होऊन आग लागली.
शुक्रवारी सकाळी कीव्हवर झालेल्या हल्ल्याचा हा फोटो युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेर्शेंको यांनी शेअर केला आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर स्फोट होऊन आग लागली.

रशिया आणि युक्रेन युद्धाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट...

  • रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 137 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 316 जण जखमी झाले आहेत.
  • अमेरिकेच्या अहवालानुसार, रशियाने युक्रेनवर एकूण 203 हल्ले केले, ज्यामध्ये 160 हल्ले क्षेपणास्त्रे आणि 83 जमिनीवर आधारित लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला.
  • रशियन सैन्याने युक्रेनच्या कोनोटोप शहराला वेढा घातला असून बाकीच्या सैन्याने राजधानी कीवच्या दिशेने आगेकूच केली.
  • रशियाची राजधानी मॉस्को येथे युद्धाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...