आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine War: Ukraine Drops One Russian Missile And Two Drones, Killing 34,000 Russian Soldiers So Far | Marathi News

रशिया-युक्रेन युद्ध:युक्रेनने एक रशियन क्षेपणास्त्र आणि दोन ड्रोन पाडले, आतापर्यंत 34 हजार रशियन सैनिक ठार

कीव्ह8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास चार महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. मंगळवारी, युक्रेनच्या हवाई दलाने दावा केला की, त्यांनी एक रशियन क्षेपणास्त्र, दोन ड्रोन आणि दोन दारूगोळा डेपो नष्ट केले आहेत. युक्रेनच्या हवाई दलाने ही माहिती फेसबुकवर शेअर केली आहे. हवाई दलाने कीव्ह आणि डोनेस्तक भागात दोन ड्रोन पाडले, असे निवेदनात म्हटले आहे.

24 फेब्रुवारी ते 21 जून दरम्यान युक्रेनियन सैन्याने सुमारे 34,100 रशियन सैनिक मारले, असा युक्रेनचा दावा आहे. मंगळवारी युक्रेनच्या सैन्याने 26 रशियन सैनिकांना ठार केले. खार्किवच्या औद्योगिक जिल्ह्यात रशियन सैन्याने गोळीबार केला, ज्यात सात नागरिक जखमी झाले.

21 जून रोजी यूएस ऍटर्नी जनरल मेरी गारलँड यांनी युक्रेनला अचानक भेट दिली. मेरिकच्या भेटीचा उद्देश युक्रेनला मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न वाढवणे आणि युद्ध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या रशियनांची ओळख पटवणे आणि त्यांच्यावर खटला चालवणे हा होता. यावेळी त्यांनी रशियन युद्ध गुन्ह्यांच्या तपासात मदत करण्यासाठी वरिष्ठ सॉलिसिटरची नियुक्ती करण्याची घोषणा केली.

युद्धा दरम्यान, रशियाने युक्रेनमधून दोन माजी अमेरिकन सैनिकांना ताब्यात घेतले आहे, त्यांची नावे अलेक्झांडर ड्रुक आणि अँडी हुइन आहेत. हे दोघेही युक्रेनच्या बाजूने युद्धात सहभागी होते, असा दावा रशियाने केला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हे दोघेही स्वेच्छेने रशियाशी लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात सामील झाले होते.

बातम्या आणखी आहेत...