आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine War Update | 24,000 Km Of Roads And 300 Bridges Destroyed In 101 Days In Ukraine | Marathi News

रशिया-युक्रेन युद्ध अपडेट:युक्रेनमध्ये 101 दिवसांत 24 हजार किमीचे रस्ते आणि 300 पूल उद्ध्वस्त, सुमारे 820 कोटींचे नुकसान

कीव्ह/मॉस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला आज 101 दिवस पूर्ण झाले आहेत. रशियाने युक्रेनच्या 20% भूभागावर कब्जा केला आहे. त्याचवेळी, रशियन सैन्याने आतापर्यंत युक्रेनमधील 24 हजार किलोमीटरचे रस्ते आणि 300 पूल उद्ध्वस्त केले आहेत.

कीव्ह स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (KSE) च्या विश्लेषण विभागाच्या अहवालानुसार, युक्रेनच्या अर्थव्यवस्थेचे युद्धात आतापर्यंत $ 105.5 दशलक्ष (सुमारे 820 कोटी) नुकसान झाले आहे. अहवालानुसार, गेल्या आठवड्यातच अर्थव्यवस्थेला $8 बिलियन (सुमारे 62 हजार 155 कोटी रुपये) पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

आफ्रिकन युनियनचे प्रमुख आणि रशियन राष्ट्राध्यक्षांची भेट
आफ्रिकन युनियनचे प्रमुख आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात शुक्रवारी बैठक झाली. खरं तर, दोघांनाही एकमेकांची गरज आहे कारण आफ्रिकेला खाद्य सामग्री आणि रशियाला मित्रांची गरज आहे.

आफ्रिकेत दुष्काळ,अंतर्गत हिंसाचारपूर्वीच खाद्य संकट होते. युद्धामुळे आफ्रिकेतील खाद्य संकट अधिक गंभीर होत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत आफ्रिकेला रशियाकडून मोठ्या आशा आहेत. आफ्रिकेतील अनेक देश गहू, मका, खाद्यतेल यांसारख्या मुख्य अन्नपदार्थांसाठी युक्रेन आणि रशियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते.

लोक त्यांच्या घरी परतत आहेत
युक्रेनने रशियन सैन्याच्या ताब्यातून परत घेतलेल्या भागात लोक आपापल्या घरी परतत आहेत. कीव्हच्या वायव्येस 58 मैलांवर असलेल्या कुखारी गावात वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधा पुनर्संचयित करण्याचे काम सुरू झाले आहे.

शुक्रवारी एका वीज कर्मचाऱ्याने क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले विद्युत खांब परत लावले. यादरम्यान काही लोक घरातील ढिगारा साफ करताना दिसले. मात्र, छोट्या शहरांतील लोकांना उशिरा मदत मिळत आहे.

जर्मन खासदारांनी शुक्रवारी 100 अब्ज युरो (सुमारे 83 हजार 289 कोटी रुपये) च्या प्रस्तावाला मंजुरी दिली. लष्कराला तांत्रिक शस्त्रांनी सुसज्ज करणे हा त्याचा उद्देश आहे. या प्रस्तावाच्या बाजूने 90% मते पडली.

युक्रेनमध्ये रॉयटर्सचे दोन पत्रकार जखमी
शुक्रवारी युक्रेनमध्ये रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या पत्रकारांच्या वाहनाला आग लागली. त्यामुळे दोन पत्रकार जखमी झाले तर एका चालकाचा मृत्यू झाला. रॉयटर्सने वृत्त दिले की पत्रकार रशिया-युक्रेन युद्ध कव्हर करण्यासाठी पूर्व युक्रेनियन शहर स्वयारोडोनेत्स्क येथे जात होते, ज्याला सध्या रशियन सैन्याने लक्ष्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...