आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाला वर्ष पूर्ण होतांना रशिया पुन्हा हल्ला करणार:युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा; 5 लाख रशियन सैनिकांची तुकडी सज्ज

कीव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी दावा केला आहे की, 24 फेब्रुवारी रोजी रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मोठ्या हल्ल्याची योजना आखत आहे. यासाठी लाखो सैनिक जमविण्यात आले आहेत. रेझनिकोव्ह यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, हल्ले फक्त रणगाडे, लढाऊ विमाने आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी थांबवले जाऊ शकतात.

रशियन हल्ल्यानंतर टेडीला ढिगाऱ्यातून बाहेर काढल्याचे चित्र आहे.

रशियाचे 5 लाख सैनिक हल्ल्यासाठी सज्ज
रेझनिकोव्ह यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, रशियाने अधिकृतपणे सांगितले की त्यांनी 3 लाख सैनिकांची तुकडी तयार केली आहे. परंतु आमच्या अंदाजानुसार ही संख्या खूपच जास्त आहे. नव्या हल्ल्यासाठी रशियाने 5 लाख सैनिक तैनात केले आहेत.

रेझनिकोव्हच्या दाव्याला अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉरनेही पाठिंबा दिला आहे. रशिया पश्चिम युक्रेनमध्ये वेगाने प्रगती करण्याचा प्रयत्न करेल, असे संस्थेचे म्हणणे आहे. यासाठी तो मोठा हल्ला चढवण्याच्या तयारीत आहे.

निवासी भागावर रशियन हल्ल्यात 8 लोक जखमी
ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी देखील सांगितले की बुधवारी रशियन हल्ल्यात क्रामतोर्स्कमध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला. तर डोनेस्तक भागातील एका निवासी इमारतीवर डागलेल्या क्षेपणास्त्रात 8 जण जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू असल्याने जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...