आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाने या आठवड्यात एका व्यक्तीला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले आहे, त्याच्यावर काही दिवसांत खटला सुरू होईल. अॅलेक्सी मोस्कालयेव्ह नावाच्या या व्यक्तीचा गुन्हा असा होता की, त्याच्या मुलीने युक्रेन युद्धाला विरोध करणारे पेंटिंग बनवले होते. त्यानंतर रशियन सैन्याचा अपमान केल्याप्रकरणी वडील आणि मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एवढेच नाही तर पुतिन यांच्या पोलिसांनी 32 हजार रुबल (रशियन चलन) दंडही वसूल केला. ते आपल्या मुलीचे संगोपन नीट करत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तपास संस्थेने युक्रेन युद्धावरील त्यांच्या वक्तव्यांची तुलना बलात्काराच्या गुन्ह्याशी केली.
शाळेतील एका पेंटिंगपासून सुरू झाले प्रकरण
एप्रिलमध्ये गतवर्षी युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर, अॅलेक्सीच्या मुलीच्या शाळेला रशियाच्या युद्धाचे समर्थन करणारी एक पेंटिंग बनवण्यास सांगण्यात आले. यावर, अॅलेक्सीची मुलगी माशाने एक पेंटिंग बनवली, जी युद्धाच्या विरोधात होती.
माशाने पेंटिंगमध्ये एक मूल आणि त्याची आई दर्शविली. त्यावर लिहिले होते - युद्ध होऊ नये. तसेच युक्रेनच्या समर्थनार्थ घोषणाही लिहिल्या होत्या. एका दिवसानंतर, माशाच्या शिक्षकांनी अलेक्सीला शाळेत बोलावले. वडील आणि मुलीला गाडीत बसवून चौकशीसाठी नेले.
वॉरंटशिवाय केली अटक
रशियातील युद्धावर टीका होऊ नये म्हणून पुतिन प्रत्येक प्रकारे निर्बंध लादत आहेत. अॅलेक्सीही याचे बळी ठरले. स्थानिक पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांची मुलगी माशाला केअर सेंटरमध्ये पाठवले.
अॅलेक्सी यांनी रशियाच्या मानवाधिकार गटाला सांगितले की, 30 डिसेंबर रोजी त्यांच्या घराबाहेर त्यांना अटक करण्यासाठी 5 पोलिस कार आणि एक फायर ट्रक आले होते. त्यांनी वॉरंटशिवाय आपल्या घरात प्रवेश करावा असे त्यांना वाटत नव्हते. मात्र, त्या लोकांनी बळजबरीने दरवाजा उघडला. यानंतर पोलिस आणि रशियाची फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस म्हणजेच एफएसबीने त्यांच्या घराची झडती सुरू केली. त्यांनी सामानाची नासधूस करायला सुरुवात केली. अॅलेक्सी यांनी आरोप केला आहे की, त्यांनी मोबाइल फोन, लॅपटॉप आणि त्यांची मुलगी माशा हिने बनवलेल्या पेंटिंगसह त्यांची सर्व बचत काढून घेतली. अल जझीराच्या वृत्तानुसार, रशियाने अॅलेक्सींच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
खोलीत कैद करून तासनतास रशियाचे राष्ट्रगीत ऐकवले
सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना एका खोलीत डांबून ठेवल्याचे अॅलेक्सींचे म्हणणे आहे. भिंतीवर डोकं आपटून त्यांचा छळ करण्यात आला. यासोबतच रशियाचे राष्ट्रगीत त्यांना मोठ्या आवाजात ऐकवण्यात आले. जे असह्य होते.
अॅलेक्सींवरील खटला काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. आता त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अॅलेक्सींशी त्यांचे वकील आणि तपास यंत्रणा वगळता कोणीही संपर्क करू शकत नाही. माशाला आता शेल्टरमध्ये ठेवण्यात आले आहे. अॅलेक्सीचे वकील बिलिएन्को यांनी सांगितले की, आम्ही माशाला घरी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. वडिलांना तुरुंगात टाकले तर तिला बाल सुधारगृहात राहावे लागेल. या प्रकरणात किमान 3 वर्षांची शिक्षा होईल. राजकीय बाब असल्याने अॅलेक्सींच्या शिक्षेत वाढही होऊ शकते.
एका वर्षात 544 अल्पवयीनांना शिक्षा
रशियाच्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या मीडिया हाऊस OVD-इन्फो इंग्लिशचे व्यवस्थापक डॅन स्टोरीएव्ह यांनी अल जझीराला सांगितले की, गेल्या वर्षी 544 अल्पवयीन मुलांना लिहिणे, बोलणे किंवा युद्धाच्या विरोधात निषेध केल्यामुळे शिक्षा झाली आहे. युद्धाविरुद्ध हिंसक आंदोलन करणाऱ्या अनेक अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.
गतवर्षी ऑक्टोबरमध्ये मॉस्कोमधील एका 10 वर्षांच्या मुलीने तिच्या वर्गातील ग्रुप चॅटमध्ये सेंट जेव्हलिनचे छायाचित्र तिचा प्रोफाइल फोटो म्हणून वापरले होते. ज्याची तक्रार तिच्या वर्गमित्राच्या कुटुंबीयांनी पोलिसांत केली होती. वास्तविक, सेंट जेव्हलिन हे एक सोशल मीडिया मीम आहे ज्यामध्ये व्हर्जिन मेरीच्या हातात मोठी बंदूक दाखवण्यात आली होती.
युक्रेनच्या युद्धातील समर्थनार्थ ते शेअर केले जात होते. तक्रारीनंतर पोलिसांनी मुलगी आणि तिच्या आईला चौकशीसाठी बोलावून त्यांच्या घराची झडती घेतली. मात्र, त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.
इतर प्रकरणे ज्यात शिक्षा झाली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.