आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine War Updates । Vladimir Putin Vs Zelenskyy | Russia Ukraine News | Mariupol Human Corridor

युक्रेनवरील हल्ल्याचा 42वा दिवस:बेलारूसमधून रशियन सैन्याचा हल्ला, युक्रेनचा दावा - एकाच दिवसात आठ रशियन क्रूझ क्षेपणास्त्रे केली नष्ट

कीव्ह/मॉस्को4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज रशिया-युक्रेन युद्धाचा 42वा दिवस आहे. दरम्यान, युक्रेनच्या हवाई दलाने दावा केला आहे की, रशियन सैन्य बेलारूसवरून क्षेपणास्त्रे डागत आहे. हवाई दलाने सांगितले- रशियन सैन्याने आता बेलारूसला आपले लॉन्च पॅड बनवले आहे. तेथून युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला जात आहे. यासोबतच युक्रेनने रशियाची आठ क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट केल्याचा दावाही केला आहे.

पुतीन यांच्या मुलींवर निर्बंधांची तयारी

दुसरीकडे, युरोपियन युनियन आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलींवर निर्बंध लादण्याची तयारी करत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पुतीन यांची मुलगी नेदरलँडमध्ये राहत होती, रशियाने तिची ओळख उघड होऊ दिलेली नाही.

इतर अपडेट्स...

  • न्यूझीलंड सरकारने रशियाकडून होणाऱ्या सर्व आयातीवर 35 टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार उपकरणे आणि इंजिन यासारख्या औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीवरही बंदी घालण्यात येणार आहे.
  • अमेरिका युक्रेनला 100 मिलियन डॉलरचे अतिरिक्त सुरक्षा साहाय्य देईल.
  • युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून बाहेर काढण्याचे आवाहन केले.
  • युक्रेनचे उपपंतप्रधान म्हणाले की, तुर्कीच्या मदतीने मारियुपोलला रिकामे केले जाऊ शकते.
  • रशियन सैन्याच्या सततच्या गोळीबारात 1.20 लाख लोक अजूनही मारियुपोलमध्ये अडकले आहेत.

रशियाशी युद्ध अमेरिकेच्या हिताचे नाही

व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी म्हटले आहे की, रशियाशी युद्ध हे अमेरिकन लोकांच्या हिताचे नाही. तथापि, आम्ही युक्रेनला आमचा पाठिंबा सुरू ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत. या युद्धातून सावरायला थोडा वेळ लागणार आहे आणि अमेरिका त्याचा एक भाग राहील.

युक्रेन युद्धात रशियाचे नुकसान...

आर्थिक आघाडीवर रशियाला घेरण्याची तयारी...

बिझनेस वेबसाइट ब्लूमबर्गच्या मते, अमेरिका, युरोपियन युनियन आणि जी-7 रशियामधील सर्व नवीन गुंतवणुकीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी पुतीन अपयशी होईपर्यंत ब्रिटन थांबणार नाही, असे म्हटले आहे.

ग्राफिक्सवरून समजून घ्या युक्रेन युद्धाची परिस्थिती...

डेन्मार्कने रशियन गुप्तचर अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली

डेन्मार्कने 15 रशियन गुप्तचर अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. त्यांना 14 दिवसांच्या आत डेन्मार्क सोडावे लागेल. डॅनिश परराष्ट्र मंत्री जेप्पे कोफोड म्हणतात की, हे गुप्तचर अधिकारी आपल्या देशातील हेरगिरीत गुंतलेले आहेत. यापूर्वी जर्मनी आणि फ्रान्सने रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती.

रशियन लष्करी हल्ल्यानंतर बोरोड्यांका शहरातील परिस्थिती नरसंहारग्रस्त बुचापेक्षाही वाईट झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. बोरोड्यांकावरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर नष्ट झालेल्या इमारतीचा फोटो.
रशियन लष्करी हल्ल्यानंतर बोरोड्यांका शहरातील परिस्थिती नरसंहारग्रस्त बुचापेक्षाही वाईट झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. बोरोड्यांकावरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर नष्ट झालेल्या इमारतीचा फोटो.

हायपरसोनिक शस्त्रे विकसित करण्याची तयारी

रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात जगातील इतर देशही शस्त्रसाठा वाढवत आहेत. युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने मंगळवारी घोषणा केली की ते हायपरसोनिक शस्त्रे विकसित करण्यासाठी समन्वय वाढवतील.

युद्धादरम्यान रशिया आणि युक्रेनच्या कलाकारांची शांततेसाठी एकत्र प्रार्थना

इटलीतील सॅन कार्लो ऑपेरा हाऊसमध्ये एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. तेथे रशिया आणि युक्रेनमधील कलाकार एकत्र आले आणि रेड क्रॉससाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी सादरीकरण केले. यावेळी शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. एकत्र परफॉर्म करणाऱ्यांमध्ये युक्रेनच्या डेनिस चेरविको आणि रशियाच्या मारिया याकोव्हलेवा यांचा समावेश आहे. रशियन आक्रमणामुळे डेनिसने युक्रेन सोडले. त्याचवेळी या हल्ल्यांचा राग मनात धरून मारियाने इटली गाठली.

बातम्या आणखी आहेत...