आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine War | World Reacts On Russia Ukraine War, Who Will Respond Against Russia NATO, UK, US, EU

दिव्य मराठी इंडेप्थ:रशियाने हल्ले सुरू केल्यानंतरही NATO कडून केवळ शाब्दिक निषेध! संकटात सापडलेल्या यूक्रेनला कोणते देश देऊ शकतात साथ?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कित्येक वर्षांपासून सुरू असेलल्या वादानंतर अखेर रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केले. लष्करी कारवायांची घोषणा करतानाच कुणीही यात हस्तक्षेप केला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी व्लादिमीर पुतिन यांनी जगाला दिली. ही धमकी प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटन आणि नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (NATO) साठी होती.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी युक्रेन आपला बचाव करेल आणि जिकेल असा विश्वास दर्शवला. सोबतच, पुतिन आणि रशियाला रोखण्यासाठी जगाकडे हीच खरी वेळ आहे असेही म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर तिन्ही बाजूंनी हल्ले सुरू केले असताना आता युक्रेनची साथ कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाटोकडून केवळ शाब्दिक निषेध

नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. पुन्हा पुन्हा इशारा दिल्यानंतरही रशियाने एका लोकशाहीप्रधान देशावर हल्ल्याचा मार्ग निवडला. यावर नाटोची लवकरच बैठक होणार असून या कठीण परिस्थितीत आम्ही युक्रेनसोबत आहोत असे स्टोल्टेनबर्ग म्हणाले आहेत.

बायडेन म्हणाले- अख्ख्या जगाच्या प्रार्थना युक्रेनसोबत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हल्ल्यांना विरोध केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, साऱ्या जगाच्या प्रार्थना सध्या युक्रेनसोबत आहेत. या युद्धामुळे होणाऱ्या विनाश आणि मृत्यूंसाठी केवळ रशिया जबाबदार राहील. सहकारी देशांनी एकजूट होऊन या हल्ल्यांना उत्तर द्यावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी गुरुवारी G-7 देशांची बैठक बोलावल्याची माहिती दिली. या बैठकीनंतर पुढील धोरण ठरवले जाणार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले- रशियाला सामूहिक उत्तर देऊ!

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी म्हटले की यूक्रेनमध्ये जे काही घडतेय ते धक्कादायक आहे. ब्रिटन आणि आमचे मित्र राष्ट्र रशियाच्या या कारवाईला निर्णायक प्रत्युत्तर देतील. यासंदर्भात युक्रेनच्या राष्ट्राध्यांसोबत चर्चा झाली. त्यांना देखील रशियाच्या कारवाईला प्रत्युत्तर दिले जाणार असल्याची माहिती दिली. सर्व मित्र राष्ट्र एकत्रित चर्चा करून सामूहिक उत्तर देणार आहेत.

इतर प्रमुख देशांनी काय म्हटले?

  • युरोपियन संघाचे प्रमुख डेर लेयेन यांनी सांगितले, की क्रेमलिनला (रशिया) या संपूर्ण कारवायांसाठी जबाबदार धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कठिण परिस्थितीत आम्ही युक्रेनच्या निष्पाप महिला, पुरुष आणि मुलांसोबत आहोत.
  • दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात वाईट वेळ आहे असे बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रू यांनी म्हटले आहे.
  • चेक रिपब्लिकचे परराष्ट्र मंत्री जॅन लिपाव्स्की यांनी म्हटले की रशियाचे हल्ले आक्रामक आणि मानवतेच्या विरोधात आहेत. चेक रिपब्लिक आणि मित्र राष्ट्र मिळून यास प्रत्युत्तर देतील.

आर्टिकल-4 लागू करू शकते NATO
नाटोच्या आर्टिकल-4 नुसार प्रादेशिक सार्वभौमत्व, राजकीय स्वातंत्र्य किंवा सुरक्षेला धोका असल्यास सर्व सदस्य राष्ट्र यावर चर्चा करतात. कुठलाही सदस्य राष्ट्र आर्टिकल-4 लागू करू शकतो. यानंतर प्रामुख्य्याने त्याच मुद्द्यावर चर्चा करून संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला जातो. 1949 मध्ये स्थापित झालेल्या नाटोने आतापर्यंत 6 वेळा हा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...