आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रशियाची लढाऊ विमाने युक्रेनची राजधानी कीव्हवर घिरट्या घालत आहेत. ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत आहेत. अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या काळात जसा प्रयत्न झाला होता, तसाच प्रयत्न त्यांना वेळेत घरी आणण्यासाठी केला गेला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.
मात्र, आता याप्रकरणी भारत सरकार सक्रिय झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.
एका अहवालानुसार, सध्या युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय अडकले आहेत. त्यात वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि येथील त्यांचे कुटुंब अशा वेळी सुषमा स्वराज आणि त्यांची काम करण्याची पद्धतीची आठवण येत आहेत. त्यांचे परराष्ट्र मंत्री असताना एका ट्विटवर, परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी भारताचे जहाज पोहोचायचे.
सोशल मीडियावर भारतीय युजर्सच्या प्रतिक्रिया पाहता सुषमा स्वराज यांची अधिक चांगली काम करण्याची पद्धत सर्वांनाच पसंत पडल्याचे दिसते.
5 वर्षे, 186 देश, 90 हजार भारतीयांनी केली मदत
परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा अर्थच बदलून टाकला. 2014 ते 2019 या काळात त्या परराष्ट्र मंत्री होत्या. परराष्ट्र मंत्रालय, जे उच्च प्रोफाइल आणि मोठ्या लोकांचे मंत्रालय मानले जात होते, त्याला तेव्हा सामान्य भारतीयांचे मंत्रालय म्हटले जायचे. परदेशात अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य भारतीयांना मदत करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. सुषमा स्वराज यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात 186 देशांमध्ये 90 हजारांहून अधिक भारतीयांना मदत केली होती.
जेव्हा भारतीयांना वाचवण्यासाठी युद्ध थांबवले गेले
2015 मध्ये येमेनमध्ये सौदी युती सेना आणि हुथी बंडखोरांमध्ये भयंकर युद्ध झाले. येमेनची राजधानी साना येथे सौदी आघाडीचे सैन्य सतत बॉम्बहल्ला करत होते. अशा स्थितीत येमेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय कामगारांनी सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली, मात्र शहरावर लढाऊ विमाने घिरट्या घालत असल्याने एकाही नागरी जहाजाला सनामध्ये उतरणे शक्य झाले नाही.
अशा परिस्थितीत सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने भारत सरकारने सौदी अरेबियाला काही काळ हल्ला थांबवण्यास सांगितले. सुषमा स्वराज यांनीही आपल्या मुत्सद्देगिरीने सौदी अरेबियाला यासाठी पटवून दिले. त्यानंतर सौदीने आठवडाभर दिवसा बॉम्बफेक थांबवली. दरम्यान, तेथे अडकलेले 5 हजारांहून अधिक भारतीय सुखरूप मायदेशी परतले. याला 'ऑपरेशन राहत' या नावाने ओळखले जाते.
व्हीके सिंग स्वतः जायचे भारतीयांना आणायला, परदेशी लोकांनाही केली मदत
सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना, परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांच्यासह अनेक उच्च अधिकारी स्वत: युद्धग्रस्त भागांना भेटी देऊन भारतीय नागरिकांना देशात आणायचे. 2015 मध्ये, 48 देशांतील 2,000 हून अधिक परदेशी नागरिकांसह पाच हजार भारतीयांना येमेनमधून युद्धक्षेत्रातून बाहेर काढण्यात आले. हा असा काळ होता जेव्हा परदेशी सरकारांनी भारताला भारतीयांसह त्यांच्या नागरिकांना युद्धक्षेत्रातून बाहेर काढण्याचे आवाहन केले होते. परदेशी नागरिक भारतीयांसोबत सुरक्षितपणे भारतात यायचे आणि नंतर इथून आपल्या देशात जायचे.
सुदानपासून लिबियापर्यंत 'संकटमोचन' बनले होते
परदेशात युद्धात किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटात अडकलेल्या भारतीयांसाठी सुषमा स्वराज तत्काळ कृतीत उतरत असत. 2016 मध्ये दक्षिण सुदानमध्ये युद्धात अडकलेल्या भारतीयांसाठी 'ऑपरेशन 'संकटमोचन' राबवून 500 लोकांना भारतात आणण्यात आले होते. तसेच लिबिया युद्धापूर्वी भारतीयांना वेळेत घरी आणण्यात आले होते.
त्याच धर्तीवर सुषमा स्वराज यांनी मुक-बधिर गीताला पाकिस्तानात भरकटलेल्या भारतात आणून तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले होते. तसेच पासपोर्ट आणि पैशांशिवाय जर्मनीत अडकलेल्या एका भारतीय मुलीलाही भारतात बोलावण्यात आले होते.
असे परराष्ट्रमंत्री ज्या भारतीयांना मंगळावरुन वाचवण्याच्या चर्चा करत
एखाद्याला भारतात उपचार घ्यावे लागतात किंवा उपचारासाठी भारताबाहेर जावे लागते. परदेशात मालकाने पासपोर्ट जप्त केला असेल किंवा इतर काही संकटे असोत, सुषमा स्वराज आपल्या संपूर्ण सरकारी कर्मचार्यांसह फक्त एका ट्विटमध्ये मदतीसाठी हजर होत्या. सुषमा स्वराज यांना ट्विट करणे ही मदतीची हमी मानली जात होती. एकदा एका यूजरला रिप्लाय देताना सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की, 'तुम्ही मंगळावर जरी अडकले असाल तरी तुमच्या मदतीसाठी भारतीय दूतावास तिथे पोहोचेल.'
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी आतापर्यंत काय झाले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.