आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Vs Ukrain War | Kiev | One Million People Flee The Third Day Of Russian Invasion Of Ukraine, Kiev Bombing Continues

तख्तपालटासाठी 4 रशियन प्यादे:युक्रेनवर रशियन हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी 10 लाख लोकांचे पलायन, कीव्हवर बॉम्बवर्षाव सुरूच

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियाच्या हल्ल्याबाबत देशातील जनतेत मतमतांतरे

रशियन सैन्याने युक्रेनवर केलेल्या कारवाईबाबत जनतेमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसून येतात. सर्वात आधी रशियन संसदेच्या दाेन्ही सभागृहांनी परदेशी लष्करी कारवाईला मंजुरी दिली हाेती हे लक्षात घ्यावे लागेल. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मांडलेल्या प्रस्तावाचे संसदेने समर्थन केले हाेते. संसदेतील मंजुरीच्या साेळा तासांनंतर रशियाच्या सैन्याने युक्रेनवर कारवाईला सुरुवात केली हाेती. या कारवाईबाबत रशियन समाजाच्या भावना जाणून घेऊया.

रशियातील वयस्कर मंडळी रशियाच्या कारवाईचे समर्थन करताना दिसून येतात. परंतु साेव्हिएत संघाच्या विघटनानंतरच्या काळात जन्मलेल्या पिढीने युद्धाला विराेध केला आहे. तरुणांमध्येही एक गट युक्रेनला धडा शिकवणे गरजेचे हाेते, असे मानणाऱ्यांपैकी आहे. परंतु या वर्गाचा युद्धाला विराेध आहे. १९ वर्षीय व्लादिमीर म्हणाला, युक्रेनच्या स्वतंत्र झालेल्या दाेन प्रदेशांंना रशियाने मान्यता दिली हे चांगले झाले. परंतु त्यासाठी रशियन सैन्याचा वापर करणे चुकीचे आहे. रशियन सैन्याने सीमा ओलांडण्याऐवजी इकडूनच दाेनेत्स्क व लुगांस्क या प्रदेशांना छुपी मदत करायला हवी हाेती.

अल्याेना नावाची किशाेरवयीन म्हणाली, युक्रेनमध्ये हस्तक्षेप करण्याची आपल्याला काय गरज हाेती. ताे त्यांचा अंतर्गत विषय आहे. ताे त्यांनीच साेडवायला हवा हाेता. तरुणांसाठी राेजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. आन्ना नावाची मध्यमवयीन महिला म्हणाली, दुसऱ्या महायुद्धात युक्रेनला साथ दिली होती. परंतु युक्रेन आता पश्चिमेकडील फॅसिस्टांसोबत आहे. युक्रेनचे शासक आता तेथील रशियन नागरिकांचे दमन करत आहेत.

थर्मोबॉम्ब : रशियाचे मारक अस्त्र

रशिया आता युक्रेनवर थर्मोबाॅम्ब हल्ल्याची तयारी करत आहे. २०१७ मध्ये अमेरिकेने अशा बाॅम्बचा वापर अफगाण युद्धात तालिबानवर केला होता. तो १९६० मध्ये अमेरिका व तत्कालीन सोव्हिएत संघाने तयार केला होता. २००७ मध्ये रशियाने सर्वात मोठा थर्मोबाॅम्ब तयार केला होता. त्याद्वारे ३९.९ टन समान स्फोट घडवला जाऊ शकतो.

युक्रेनमध्ये चारपैकी एकाकडे पुतीन राष्ट्रपतिपद देणार
रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव्हला घेराव घातला आहे. रशियाने युक्रेनच्या लष्कराला शस्त्रे खाली ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन युक्रेनमध्ये जेलेन्स्की सरकारच्या जागी आपले प्यादे सत्तेवर बसवतील. रशियाचे समर्थक असलेल्या युक्रेनचे काही नेते व माजी लष्करी अधिकाऱ्यांकडे ही सूत्रे सोपवली जाऊ शकतात. युक्रेन स्थापनेच्या पहिल्या तीन दशकांत रशियन समर्थक अनेक पंतप्रधान व राष्ट्रपती पदावर राहिले आहेत. युक्रेनच्या डोनबास प्रांताचा रशियाला पूर्ण पाठिंबा आहे. या सगळ्या गोष्टी रशियासाठी जमेच्या आहेत. म्हणूनच रशियाने युक्रेनच्या सत्तापटावर आपले प्यादे बसवण्याच्या तयारीला वेग आणला आहे.

अमेरिकेने रशियावर निर्बंध लादल्यानंतर आता भारत रशियासोबत व्यापारासाठी रुपया तंत्र विकसित करण्याच्या तयारीत आहे. त्यातून रशियाची हानी कमी होईल. यातून भारताला व्यापाराची संधी मिळणार आहे. त्यासाठी रशियन बँकांना भारतात खाते उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

एका दावेदाराचे स्वत:चे चॅनल

1. येवहेन मुरायेव
युक्रेनचे माजी खासदार. रशिया समर्थक टीव्ही वाहिनी चालवतात. जास्त काळ रशियात रमतात. हल्ल्यानंतर मुरायेव कॅरेबियन किनारी सुटीवर आहेत. मुरायेव स्वत:ला युक्रेनच्या सत्तेचे दावेदार नसल्याचे सांगतात.

2.आंद्रेय क्लूयेव

युक्रेनचे मोठे उद्योजक. २०१० ते २०१२ पर्यंत उपपंतप्रधान. रशिया समर्थक माजी राष्ट्रपती यानुकोविच यांचे चीफ ऑफ स्टाफ. फुटीरवादी दोनेत्सकच्या कौन्सिलवरही होते. पुतीन यांचे कट्टर समर्थक. रशियाला नेहमी जाणे-येणे.

3. शेर्री अरबुजोव
२०१२ ते २०१४ पर्यंत उपपंतप्रधान. काळजीवाहू पंतप्रधानपदाचाही अनुभव. २०१४ मध्ये रशियाच्या क्रिमियावरील हल्ल्याचा निषेध करणे त्यांनी टाळले. युक्रेनमध्ये त्यांना विरोधही झाला. ब्रिटनच्या निर्बंधाच्या यादीत समावेश.

4.मायकोला अजारोव
२०१० ते २०१४ पर्यंत पंतप्रधानपदावर. सोव्हिएत संघाशी नाळ असल्याचा गर्व. पद सोडल्यापासून रशियात मुक्कामी. रशियन गुप्तचर यंत्रणा, परराष्ट्र मंत्रालयाला गोपनीय माहिती पुरवतात. विद्यमान युक्रेन सरकारचे टीकाकार.

राष्ट्रपती पुतीन युरोपात केवळ युक्रेनवर थांबतील अशी शक्यता नाही. कारण त्यांची नजर आणखी काही देशांवर असल्याचा गुप्तचरांचा अहवाल आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्या युरोपातील इतर देशांना पुतीन यांनी युक्रेन हल्ल्यातून इशारा दिला आहे. पुतीन यांच्या रडारवर शेजारील राष्ट्र फिनलंड, स्वीडन असू शकतात. आगामी काळात रशिया या दोन देशांवरही हल्ला करू शकतो. नाटोमध्ये सामील होण्यासाठी दोन्ही देश काही काळापासून प्रयत्न करत आहेत. परंतु देशाच्या सरहद्दीजवळ नाटो फौजांची तैनाती मुळीच मान्य नसल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...