आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाने शुक्रवारी पुन्हा एकदा युक्रेनवर तब्बल 70 क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. त्यात युक्रेनची 3 शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच अनेक ऊर्जा केंद्र व महत्त्वाच्या इमारतीही जमिनदोस्त झाल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, क्रिव्ही रिह क्षेत्रात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एक नागरी इमारत कोसळल्यामुळे 3 जण ठार झालेत. तर खरसोनमधील बॉम्बफेकीतही एका व्यक्तीचा बळी गेला आहे.
रशियाने हे सर्वच हवाई हल्ले राजधानी कीव्ह व युक्रेनच्या उत्तर-पूर्व भागातील खार्किव्हमध्ये केलेत. रशियाच्या हल्ल्यामुळे खार्किव्ह व सुमी भागातील वीज पुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. यामुळे संपूर्ण युक्रेनमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेनचा वीज पुरवठा अर्ध्यावर घसरला आहे. केवळ महत्त्वाची ठिकाणे उदाहरणार्थ, रुग्णालय, पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा व सीव्हेज ट्रीटमेंट प्लांट्सचाच वीज पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.
झेलेन्स्कींनी रशियाला म्हटले 'रॉकेटचा पुजारी'
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रात्री उशिरा युक्रेनच्या जनतेला एका व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात त्यांनी रशियाचा उल्लेख 'रॉकेटचा पुजारी' म्हणून केला. त्यांनी नाटो देशांना युक्रेनची हवाई सुरक्षा अधिक अभेद्य करण्यास मदत करण्याची विनंती केली. युक्रेनवर आणखी हवाई हल्ले करण्यासाठी रशियाकडे क्षेपणास्त्रांचा खूप मोठा साठा आहे, असे ते म्हणाले.
कीव्हच्या महापौरांचे जनतेला बंकर्समध्ये राहण्याचे आवाहन
कीव्हचे मेयर व्हिटाली क्लिट्स्को यांनी शुक्रवारी नागरिकांना रशियाचे हल्ले थांबेपर्यंत बंकर्समध्ये राहण्याचे आवाहन केले. गुरुवारीही रसियाने युक्रेनच्या अनेक भागांत क्षेपणास्त्र व ड्रोनने हल्ला केला होता. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला होता.
युक्रेनच्या लष्कराचीही कडवी टक्कर
रसिया सातत्याने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा करत आहे. त्याला युक्रेनही सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. बुधवारी युक्रेनने राजधानी कीव्हवर हल्ले करणाऱ्या 13 ड्रोन्सना उद्ध्वस्त केले. त्यातच युक्रेनच्या लष्कराचे जनरल ओलेक्सी रेजनिकोव्ह यांनी रशिया नववर्षात हल्ले आणखी वेगवान करण्याचा इशारा दिला आहे. रशिया युक्रेनविरोधात 2 लाख नवे सैनिक तैनात करण्याच्या विचारात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.