आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझेक प्रजासत्ताकच्या चार्ल्स विद्यापीठात शिक्षण घेणारे वैशाख मानाथ पनक्कल म्हणाले, युरोपावर मोठा परिणाम दिसून येईल. झेक प्रजासत्ताकमध्ये राहणारे भारतीय विद्यार्थी, भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत. युद्धाच्या शक्यतेमुळे कुटुंबीयदेखील चिंतेत आहेत. ते वेळोवेळी परिस्थिती कशी आहे, अशी विचारणा करू लागले आहेत.
भारतीयांकडे मायदेशी परतण्याचा एकमेव पर्याय
बेल्जियम विद्यापीठात पदव्युत्तर संशोधन करणारे देबाशिष पांडा म्हणाले, युद्ध झाल्यास त्याचा परिणाम युरोप संघावर दिसू शकतो. युरोपवर रशिया अनेक बाबतीत अवलंबून आहे. युद्धामुळे युरोपीय अर्थव्यवस्था डगमगेल. अशा स्थितीत दीर्घकाळ येथे राहणे भारतीय विद्यार्थ्यांसाठी जोखमीचे ठरेल. म्हणूनच नंतर मायदेशी परतणे हाच मार्ग राहील.
आम्ही सज्ज : युक्रेनमध्ये राष्ट्रीय एकता दिन
युक्रेन प्रकरणात युरोपीय देशांतील अस्वस्थता आता जाणवू लागली आहे. रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची पुढची चाल काय आहे, याची प्रतीक्षा युरोप व अमेरिका करत आहेत. आधी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी १६ फेब्रुवारीला रशिया हल्ला करणार असल्याचा दावा केला होता. गेल्या दोन महिन्यांपासून युक्रेनला रशियाच्या दीड लाख सैनिकांनी घेरले आहे. परंतु युक्रेनला नाटो सैन्याचे समर्थन आहे. असे असले तरी युरोपातील अनेक देशांनी आपल्या नागरिकांना तत्काळ युक्रेन सोडण्याचे आवाहन केले आहे.
युरोपीय संघाने युक्रेनमधील आपल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना मायदेशी येण्याची सूचना केली आहे. युरोपीय संघाचे प्रवक्ते पीटर स्टॅनो म्हणाले, आम्ही दूतावास सोडणार नाही. केवळ काही काळासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांना देशाबाहेरून काम करण्याची संधी देत आहोत. इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर डोनेट्सक, लुहान्सक, क्रिमियाचा प्रवास टाळण्याचीही सूचना देण्यात आली.
आवश्यकता नसल्यास पूर्व युक्रेनचा प्रवास करू नये, असा सल्ला तुर्कीने दिला आहे. नेदलँड्स, एस्टोनियानेदेखील नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे. आयर्लंडने राजदूत कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. विशेष म्हणजे रशियाने मंगळवारी युक्रेन सीमेजवळील आपले सैन्य माघारी नेण्यास सुरुवात केली आहे.
बुधवारी नाटोने हा केवळ दाखवण्याचा भाग असून सैन्य कपात नव्हे तर या भागात सैन्यवाढ करण्यात आल्याचा दावा केला. त्यातच बुधवारी युक्रेनने एकता दिन साजरा केला. त्यात सामान्य नागरिकही सहभागी झाले. ठिकठिकाणी लोकांनी रशियाच्या धोरणाचा निषेध केला. युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्सकी यांनी राष्ट्रीय सुटी जाहीर केली. जर्मनीत पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलो कविता गुप्ता म्हणाल्या, रशिया आणि युक्रेनदरम्यान थेट युद्धाची शक्यता कमी वाटते. परंतु युद्ध झाल्यास युरोपातील प्रत्येक व्यक्तीवर त्याचा परिणाम दिसून येईल. जर्मनीपर्यंत युद्धाच्या झळा पोहोचण्याची शक्यता वाटत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.