आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजी उलटली:रशियन सैन्याला वीस शहरांतून पिटाळले, पुतीन यांच्यावर टीका, युक्रेनची सरशी

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनच्या सैन्याने युद्धाच्या २०० दिवसांनंतर सर्वात मोठा हल्ला केला. युक्रेनने २४ तासांतच रशियाच्या ताब्यातील २० शहरांची सुटका केली. आता दक्षिणेकडील डोनबासचा भाग केवळ रशियाच्या ताब्यात आहे. युक्रेन सरकारचे प्रवक्ते सोमवारी म्हणाले, खारकीव्हमध्ये तर रशियन सैन्य शरणागतीस तयार आहे. युक्रेनच्या आघाडीवर रशियन सैन्याच्या पायाखालील वाळू घसरत असल्याचे पाहून व्लादिमीर पुतीन यांच्यावर देशांतर्गत टीका वाढली आहे. रशियाच्या संसदेतील पुतीन यांच्या पक्षाचे सर्गेई मिरोनाव्ह यांनी त्यांच्यावर आरोप केला. चुकीच्या निर्णयामुळे रशियन सैन्याला युक्रेन आघाडी फत्ते करता आली नाही. पुतीन यांचे कट्टर समर्थक मिरोनोव्ह म्हणाले, रविवारी मॉस्को दिन साजरा करण्याची गरज नव्हती. कारण युक्रेनमध्ये रशियन सैनिक शहीद होत आहेत.

कमांडरनी पुतीन यांना अंधारात ठेवल्याने पराभव : रमजान रशियन सैन्याच्या बाजूने आणि युक्रेनच्या विरोधात लढणारे चेचेन सैन्य कमांडर रमजान कादयारोव म्हणाले, पूर्व आघाडीवर पराभवाचा झटका बसला. रशियन कमांडर पुतीन यांना युक्रेन आघाडीबाबत अंधारात ठेवत आहेत. रशियन सैन्य मजबूत स्थितीत असल्याची चुकीची माहिती देण्यात आली.

गेम चंेजर: सैन्याकडून अमेरिकन हार्म मिसाइलने रशियन रडार उद्ध्वस्त खारकीव्हसह पूर्व भागात युक्रेनच्या लष्कराने अमेरिकेच्या हार्म क्षेपणास्त्राद्वारे रशियन सैन्यावर हल्ला केला. लढाऊ विमानातून डागल्या जाणाऱ्या हायस्पीड अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राचा ताशी वेग २३०० किमी एवढा आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारला लक्ष्य करते. अमेरिकेने युक्रेनला असे १२०० क्षेपणास्त्रे दिली आहेत. रशियन रडार प्रणालीकडे त्यावर काही तोडगा नाही.

रशियन डाव : युक्रेनविरुद्ध रासायनिक हल्ल्याची शक्यता, खारकीव्हला हल्ले रशिया युक्रेनच्या विरोधात सायबर हल्ला करण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील आघाडीवर पराभूत झाल्यामुळे भडकलेला रशिया रासायनिक हल्ला करू शकतो. सोमवारी सायंकाळी रशियन सैन्याने खारकीव्हमध्ये जल-विद्युत पुरवठ्याच्या ठिकाणांवरील हल्ले वाढवले आहेत. युक्रेनच्या ताब्यातील शहरांवर लवकरच ताबा मिळवला जाईल.

बातम्या आणखी आहेत...