आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनला एक लाखाहून जास्त रशियन सैन्याने घेराव घातला आहे. रशियन घेराव व युक्रेनवरील हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिका व रशिया यांच्यात मंगळवारीदेखील चर्चा सुरूच राहिली. या बैठकीत अद्याप काही ताेडगा निघू शकला नाही. रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री रायबाकाेव्ह यांनी अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन यांच्यासमाेर एकसूत्री मुद्दा मांडला आहे. अमेरिकेने युक्रेनला लष्करी संघटना नाटाेमध्ये सहभागी करून घेऊ नये. अमेरिकेसाेबत याबाबत स्पष्ट असा करार हवा असल्याचे रशियाचे सूत्र सांगतात. रशियाने नाटाेला देशात प्रवेशही करू दिलेला नाही. त्यापासून अंतर राखले आहे. त्यामुळे हा पेच वाढल्याचे सांगितले जाते. तूर्त तरी अमेरिकेने युक्रेनला नाटाेमध्ये सहभागी करून घेण्याबद्दलचे काेणतेही आश्वासन दिलेले नाही. पूर्वेकडील साेलाेटी, बाेगुचार, उत्तरेकडील पाेचेप या भागातून रशियाने घेरले आहे. रशिया युक्रेनच्या सीमेवर सातत्याने सैन्य तैनाती वाढवू लागल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
रशियावरील निर्बंधाचा चीनला जास्त फायदा
भारताला सुट्या भागांची तूट
रशियावर निर्बंध लादल्यास सुखाेईसह इतर विमानांचे सुटे भाग मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. रशियासाेबतच्या संबंधामुळे भारत हा पेच साेडवण्यासाठी प्रयत्न करू शकताे.
भारताकडे पाश्चात्त्य देश-रशियांत मध्यस्थीची संधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष क्लिंटन व आेबामांचे युराेप संबंधाचे माजी सल्लागार चार्ल्स कप्शन
आता पुतीन यांना पाठिंबा नाही
एकेकाळी पूर्व युक्रेनमध्ये पुतीन यांना पाठिंबा असे. २०१४च्या हल्ल्यानंतर स्थिती बदलली. आता जनता रशियाविराेधी सरकारची निवड करतात.
अमेरिका थेट युद्धात सहभागी नाही
युद्धाच्या स्थितीत अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादल्यास चीनला त्याचा फायदा हाेणार आहे. अमेरिकेला हे नकाेय. अमेरिकेला थेट युद्धातही सहभागी व्हायचे नाही.
रशियन गॅस युराेपची नाडी
निर्बंध लादल्यास रशिया पलटवार म्हणून युराेपचा गॅॅस पुरवठा थांबवू शकताे. युराेपला ४० टक्के गॅस पुरवठा रशियातून हाेताे.
प्रो. चार्ल्स कप्शन सध्या अमेरिकेतील वाल्श स्कूल ऑफ फाॅरेन सर्व्हिस अँड डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंटचे प्रोफेसर आहेत. म्हणाले, हा पेच साेडवण्यासाठी भारताकडे पाश्चात्त्य देश तसेच रशिया यांच्यात मध्यस्थीची संधी आहे. सद्य:स्थितीबद्दल भास्करचे रितेश शुक्ल यांनी कप्शन यांच्याशी चर्चा केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.