आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या पॅट्रिएट संरक्षण प्रणालीने रशियाचे सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र किंजल हाणून पाडल्याचा दावा युक्रेनच्या वायुदलाने केला आहे. वायुदलाच्या प्रवक्त्या युरी इहनात यांनी युक्रेनच्या चॅनल 24 ला ही माहिती दिली आहे.
अमेरिकेची पॅट्रिएट क्षेपणास्त्र प्रणाली जुनी आणि रशियाची शस्त्रे जगात सर्वात सरस असल्याचे रशियाचे म्हणणे होते असे युरी म्हणाले. किंजल हवेतच नष्ट होणे ही त्यांच्या गालावरील थप्पड असल्याचेही ते पुढे म्हणाले. युक्रेनला एप्रिलच्या अखेरिस पॅट्रिएट प्रणालीची पहिली खेप मिळाली होती.
पुतिन यांनी केले होते किंजलचे कौतुक
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी किंजल संरक्षण प्रणालीचे कौतुक केले होते. ही क्षेपणास्त्र प्रणाली इतकी मजबूत आहे की, पॅट्रिएट प्रणाली त्याला कधीही हाणून पाडू शकणार नाही असे पुतिन म्हणाले होते. किंजलचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 5 पट जास्त असल्याचे सांगितले जाते. याचा पल्ला 1200 मैल इतका आहे. ही जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असल्याचे मानले जाते. एका पॅट्रिएट क्षेपणास्त्र प्रणालीची किंमत 30 लाख डॉलर म्हणजेच 24 कोटी रुपये आहे.
झपोरेझियामध्ये आण्विक अपघाताची भीती
रशियाच्या ताब्यातील क्रिमीयावर शनिवारी 10 ड्रोन्सच्या माध्यमातून हल्ला झाला होता. रशियन अधिकाऱ्यांनुसार त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने सर्व हल्ले निष्फळ ठरवले होते. यानंतर संपूर्ण युक्रेनमध्ये रात्रभर एअर रेड सायरन ऐकायला मिळाले होते.
संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी झपोरेझियातील अणू प्रकल्पाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केलेली असताना युक्रेनने क्रिमियावर हल्ला केलेला आहे हे विशेष. सध्या हा प्रकल्प रशियाच्या ताब्यात आहे.
रशियाने झपोरेझियाच्या आसपासच्या 18 ठिकाणांवरील नागरिकांना तिथून इतरत्र स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे तिथून हजारोंच्या संख्येने लोक दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. झपोरेझियामध्ये घातक आण्विक दुर्घटना घडू शकते असे इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी असोसिएशनचे संचालक राफेल ग्रोसींनी म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.