आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाला आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीवर जबर झटका बसला आहे. रशियाच्या संयुक्त राष्ट्रातील एका मुत्सद्द्याने युक्रेवरील हल्ल्याचा जाहीर निषेध करत या युद्धामुळे आपल्याला लाज वाटत असल्याचे म्हटले आहे. बोरिस व्होन्देरेव्ह असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते म्हणाले -"मी माझ्या भावना संयुक्त राष्ट्रातील माझ्या सहकाऱ्यांना कळविली आहे. युक्रेनवरील हल्ला विनाकारण व जबरदस्तीने करण्यात आला यात दुमत नाही. यासाठी आमचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन जबाबदार आहेत."
बोरिस म्हणाले -प्रथमच मान झुकली
बोरिस यांनी आपल्या राजीनाम्यात अनेक महत्वाच्या गोष्टी लिहिल्यात. ते म्हणाले -"मी 20 वर्षांपासून डिप्लोमॅट म्हणून काम करत आहे. त्यात अनेक मोहिमांत काम केले. पण, 24 फेब्रुवारीला (युक्रेनवरील हल्ला) जे काही घडले त्याची मला फार लाज वाटते." व्होन्देरेव्ह यांनी जगातील अण्वस्त्रे संपुष्टात आणण्यासाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या समितीतही काम केले आहे. त्यांनी कम्बोडिया व मंगोलिया सारख्या युद्ध मैदानातही आपल्या सेवा दिल्या आहेत.
असे प्रथमच घडले
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एखाद्या स्थायी सदस्याच्या राजनैतिक अधिकाऱ्याने राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. बोरिस यांनी आपला राजीनामा रशियन भाषेत लिहिला. त्यानंतर वृत्तसंस्थेने तो इंग्रजीत प्रकाशित केला.
'वॉशिंग्टन पोस्ट'च्या वृत्तानुसार, पुतीन यांनी आपल्या विरोधकांना नेहमीच कठोर शिक्षा केली आहे. त्यामुळे बोरिस यापुढे मायदेशी परतण्याची कोणतीही शक्यता नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे बोरिस यांनी युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहीम सुरू असल्याचा पुतीन यांचा दावाही फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते, "हा स्पष्टपणे हल्ला असून, यावरुन मी माझ्या सरकारचा बचाव करू शकत नाही. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याशिवायही माझ्या अनेक जबाबदाऱ्या आहेत."
रशियन सरकारचे मौन
बोरिस यांच्या मते -"युक्रेनवरील हल्ल्यामुळे अनेकांना कुचंबना सहन करावी लागली आहे. त्यामुळे रशियाचे अन्यही काही अधिकारी राजीनामा देऊ शकतात. सध्या दबावामुळे ते शांत आहेत. आमचे शासक आलिशान महालांत व जहाजांवर आयुष्य घालवतात. त्यांना युद्धाच्या वेदना काय माहिती? त्यांना केवळ खोटे बोलणे येते. आमचे परराष्ट्र मंत्रीही वेगवेगळ्या सूरात बोलतात. आता तिथे डिप्लोमसी नव्हे तर युद्धाची भाषा केली जात आहे. द्वेष व खोटे पसरवले जात आहे. मी जिन्हेवात राहत असून, यापुढेही येथेच राहीन."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.