आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच:रशियन सैन्याच्या कारवायांमुळे आता शांतता चर्चेची शक्यता कमी झाली आहे, कीव्हमधून बुचाला गेले झेलेन्स्की

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन सैन्याने युक्रेनवरील हल्ल्याच्या सुरुवातीच्या दिवसांत केलेले कारनामे आता समोर येत आहेत. कीव्हजवळील बुचा शहरात सुमारे ४१० नागरिक मारले गेले. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की पहिल्यांदाच युद्धादरम्यान सार्वजनिकरीत्या राजधानी कीव्हच्या बाहेर पडत जवळपास ७१ किमी दूर बुचा शहरात पोहोचले. तिथे त्यांनी स्थानिक लोकांशी चर्चाही केली. त्यानंतर झेलेन्स्की म्हणाले, बुचा शहरात रशियन सैन्याचा घाणेरडेपणा समोर आल्यानंतर आता त्यांच्याशी शांतता चर्चेची शक्यता कमी झाली आहे. रशियाला सडेतोड उत्तर देण्यासाठी युक्रेन आता आणखी दृढसंकल्पासह हल्ला करेल. पाश्चिमात्य देशांनी रशियावरील निर्बंध आणखी कडक करावेत. यात उशीर करू नये, असेही ते म्हणाले. एक व्हिडिअो संदेश जारी करत ते म्हणाले, रशियाला पोषक धोरणांमुळे काय हाल झाले, हे फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांनी बुचामध्ये येऊन पाहावे. फ्रान्स आणि जर्मनी युक्रेनच्या नाटो सदस्यत्व न देण्याची पाठराखण करत राहिले. यामुळे रशियाला आता फायदा होत आहे.

रशिया-युक्रेन युद्ध40वा दिवस
युक्रेनच्या मायकोलोव्ह शहरामध्ये बॉम्बवर्षाव
*रशियन सान्याने आता दक्षिण युक्रेनच्या मायकोलोव्ह शहरात हल्ले आणखी तीव्र केले आहेत.
*युक्रेन : सुमीच्या राज्यपालांचा दावा- रशियन सैन्याच्या ताब्यातून शहर सोडवण्यात आले आहे.
*मारियुपोलमध्ये सोमवारीही रेडक्रॉसच्या टीम पोहोचल्या नाहीत. हजारो जखमींना उपचार मिळाले नाहीत.
*लिथुआनियाने रशियाच्या राजदूतास आपल्या देशातून जाण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...