आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनवरील हल्ल्याचा 39 वा दिवस:कीव्हमधून रशियन लष्कराचा काढता पाय, रस्त्यांवर आढळले 20 सर्वसामान्य नागरिकांचे मृतदेह, हात बांधून डोक्यात घालण्यात आली होती गोळी

कीव्ह/मॉस्को4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धाचा आजचा 39 वा दिवस आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, रशियन लष्कर युक्रेनची राजधानी कीव्हच्या परिसरातून काढता पाय घेत आहे. त्यानंतर या ठिकाणी अत्यंत भीतीदायक चित्र दिसून येत आहे. कीव्ह लगतच्या एका रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांचे 20 मृतदेह आढळलेत. या लोकांचे हात बांधून डोक्यात गोळी घालण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी मृतांत पुरुष, महिला व एका 14 वर्षीय मुलाचा समावेश असल्याचा दावा केला आहे.

कीव्हवर युक्रेनचे नियंत्रण कायम

युक्रेनचे उप संरक्षण मंत्री अन्ना मल्यार यांनी कीव्हच्या सर्वच क्षेत्रावर देशाचे नियंत्रण असल्याचे स्पष्ट केले आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या एका सल्लागाराने जनतेला मारियुपोलसह देशाच्या दक्षिण व पूर्व भागातील युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

मारियुपोलमध्ये मोठ्या संख्येने लोक अडकलेत. या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड क्रॉसने शनिवारी आपल्याला अद्याप या शहरापर्यंत पोहोचण्यात यश आले नसल्याचे स्पष्ट केले होते. या ठिकाणी 1 लाखांहून अधिक जण अडकलेत.

इतर अपडेट्स....

  • कट्टरपंथियांनी रशियन लष्कराला कीव्हवरील दबाव कायम ठेवण्याची विनंती केली.
  • 19 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या एका पत्रकाराचा मृतदेह आढळला, ते कीव्हमध्ये वार्तांकनासाठी गेले होते.
  • रशियन सैनिकांच्या माघारीनंतर बूचा येथील रस्त्यांवर नागरिकांच्या मृतदेहांचा खच दिसून आला.
  • रशियन सैनिकांनी निदर्शकांवर गोळीबार केला, 4 जण जखमी
  • इंफोसिसने रशियातील आपला व्यवसाय गुंडाळण्याची तयारी सुरू केली. ब्रिटनचे मंत्री ऋषी सुन यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला. सुनक यांच्या पत्नी अक्षिता या कंपनीत भागीदार आहेत.
  • पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पोप फ्रांसिस यांनी आपण यु्क्रेनच्या युद्धाचा आढावा घेणार असल्याचे म्हटले आहे.
  • रशियासोबतच्या तणावानंतर अमेरिकेने आपल्या LGM-30G Minuteman III या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी रद्द केली.
  • राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मारियुपोलमधून 3 हजारांहून अधिक लोकांना वाचवण्याचा दावा केला.
बातम्या आणखी आहेत...