आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन तेलसम्राटाचा गूढ मृत्यू:युक्रेन हल्ल्यावरून पुतीन यांच्यावर केली होती टीका, यापूर्वीही अनेक अब्जाधीशांच्या गूढ मृत्यू

माॅस्काेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाच्या सरकारी तेल कंपनी राेसनेफ्टनंतर सर्वात माेठी खासगी तेल कंपनी लुकाेइलचे अध्यक्ष राविल मॅगानाेव्ह यांचा गुरुवारी मृत्यू झाला. ६७ वर्षीय राविल यांनी रुग्णालयाच्या सहाव्या मजल्याच्या खिडकीतून उडी घेतली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रशियातील प्रसारमाध्यमांनी केला आहे.

राविल माॅस्काेच्या सेंट्रल क्लिनिकल हाॅस्पिटलमध्ये ह्रदयासंबंधी आजाराच्या नियमित तपासणीसाठी दाखल झाले हाेते. त्यांनी वैफल्यग्रस्त असल्याची तक्रारही केली हाेती. परंतु रुग्णालयाच्या खिडकीतून त्यांनी का व कशी उडी मारली, हे गूढ बनले आहे. तपास संस्थांनी रुग्णालयाच्या वाॅर्डची चाैकशी सुरू केली आहे. राविल दाखल असलेला वाॅर्ड प्रमुख इमारतीमध्ये हाेता, असे सांगण्यात आले. त्या भागात दुरुस्तीची कामेही सुरू हाेती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद हाेते.

मॅगानाेव्ह धूम्रपानासाठी बाहेर पडले हाेते आणि त्यांनी स्वत:च उडी घेतली, अशी माहिती रशियन माध्यमे वेगाने प्रसृत करत आहेत. आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी खिडकीवर सिगारेटचे पाकीट आढळल्याचा दावाही केला जात आहे. परंतु आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी मात्र मिळालेली नाही. मध्य माॅस्काेमध्ये हे हायप्राेफाइल रुग्णालय आहे. अनेक रुग्णांवर येथे उपचार केला जाताे. साेव्हिएत संघाचे अंतिम राष्ट्रपती मिखाइल गाेर्बाचेव्ह हेदेखील येथे उपचार घेत हाेते. त्यामुळे चाेख बंदाेबस्त व निगराणीही हाेती.

पुतीन यांच्यावर टीका करणारे राविल रशियातील एकमेव उद्याेगपती हाेते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ निर्माण झाले आहे. मार्चमध्ये लुकाईल यांनी हल्ला ‘दु:खद’ असल्याचे म्हटले हाेते. त्याचबराेबर युद्ध संपवण्याचे आवाहनदेखील केले हाेते. मॅगानाेव्ह लुकाइल यांनी १९९० मध्ये ऑइल ऑपरेटर म्हणून काम सुरू केले हाेते. २०२० मध्ये ते अध्यक्ष झाले. नाेकरी करू लागल्याच्या काही वर्षांतच ते व्यवस्थापनात सहभागी झाले हाेते. त्यांच्या कुशलतेमुळेच लुकाेइल लहान तेल समूहापासून जगातील सर्वात माेठ्या ऊर्जा कंपन्यांत समाविष्ट हाेऊ शकले. ते पुतीन यांचे निष्ठावंत मानले जात हाेते. परंतु हल्ल्यावरून त्यांनी केेलेल्या टीकेनंतर समीकरण बदलले हाेते. यंदा एप्रिलमध्ये कंपनीचे सीईओ व अब्जाधीश वॅॅगिट अलेक्पेराॅव्ह यांनी संचालक व अध्यक्षपद साेडले हाेते.

रशियाचे वागणे बदलले, आता अब्जाधीशांचे गूढ मृत्यू

फेब्रुवारीत युक्रेनवरील हल्ल्यानंतर अनेक उद्याेगपतींच्या गूढ स्थितीत मृत्यूच्या घटना घडत आहेत. एप्रिलमध्ये गॅस कंपनी सर्गेई प्राेटाेसन्याचे माजी व्यवस्थापक मिलनेयर नाेव्हाटेक पत्नी व मुलीसह मृतावस्थेत आढळले हाेते. एप्रिलमध्ये खासगी बँकेचे माजी उपाध्यक्ष व्लादिस्लाव एवायेव यांचा पत्नी-मुलीसह मृत्यू झाला हाेता. मेमध्ये लुकाेइलचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक अलेक्झांडर सुबाेटिन यांचा मृत्यू झाला हाेता. ऑगस्टच्या मध्यावर पत्रकार दुगिनाची हत्या झाली.

बातम्या आणखी आहेत...