आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धात पुतीन यांचा अजब फरमान:हल्ला, युद्ध असे शब्द वापराल तर थेट तुरुंगात डांबू! व्लादिमीर पुतीन यांचे रशियन माध्यमांना आदेश

मॉस्को5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील शांतता हिसकावून घेणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक अजब फरमान जारी केला आहे. रशियन सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या मीडिया रेग्युलेटरी डिव्हिजनने शनिवारी दुपारी एक आदेश जारी केला आहे.

यामध्ये असे म्हटले आहे- कोणत्याही मीडिया हाऊसने या काळात युद्ध, हल्ला किंवा घुसखोरी असे शब्द वापरू नयेत. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित पत्रकारांना शिक्षा होऊ शकते आणि मीडिया हाऊस बंद होऊ शकते. यासोबतच भरघोस दंडही ठोठावला जाणार.

अनभिज्ञ होता मीडिया
खरे तर पुतीन यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच माध्यमांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. या अंतर्गत सूचना जारी केल्या जात होत्या. आता युद्ध सुरू झाले असून रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. पुतिन यांची समस्या अशी आहे की, अनेक लोक उघडपणे त्यांच्या लहरीपणाला आणि देशातल्या लढाऊ आवेशांना विरोध करत आहेत. त्यामुळेच ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मेनस्ट्रीम मीडिया पुतिन यांच्या विरोधकांना भरपूर कव्हरेज देत आहे.

आता काय होईल
'मॉस्को टाईम्स'च्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार - रशियन सरकारला वाटू लागले आहे की आपल्या पावलांना घरातून विरोध होत आहे. त्यामुळे आता या आवाजांना चिरडण्याची तयारी सुरू झाली आहे. मीडिया नियामकाने हा आदेश रशियन भाषेत जारी केला आहे.

या अंतर्गत मीडिया रिपोर्टिंगमध्ये हल्ला, युद्ध आणि (assault, invasion, declaration of war) घुसखोरी या शब्दांचा वापर केला जाणार नाही. उल्लंघन केल्यास शिक्षा, मीडिया ब्लॉकिंग आणि दंड आकारला जाईल. आदेशात म्हटले आहे- काही स्वतंत्र मीडिया हाऊस चुकीच्या बातम्या देत आहेत. रशियन सैन्याने युक्रेनमधील शहरांवर हल्ले केल्याचा दावा ते करत आहेत.

पुतीन यांच्या आदेशानुसार देशाची सायबर सुरक्षा एजन्सी सोशल मीडिया खात्यांवरही नजर ठेवत असल्याचे पूष्टी न झालेल्या वृत्तांत म्हटले आहे. विशेषत: पुतिन यांना विरोध करणाऱ्या खात्यांवर लक्ष ठेवले जात आहे. जे लोक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाहीत त्यांना 60 हजार रूबलचा दंडही ठोठावला जात आहे.

मीडिया हाऊसना फक्त तीच माहिती देण्यास सांगण्यात आले आहे जी सरकार जारी करत आहे. हे पाऊल उचलण्याचे एक कारण म्हणजे काही प्रसारमाध्यमांनी असा दावा केला आहे की युक्रेनियन सैन्याने रशियाचे खूप मोठे नुकसान केले आहे आणि रशियन सैनिक सतत मारले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...