आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीफ ऑफ स्टाफचा दावा:झेलेन्स्कींच्या हत्येसाठी अध्यक्षीय कार्यालयात पोहोचले होते रशियन सैनिक, कुटूंब आतमध्येच होते

कीव्ह20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर रशियन सैनिक राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या कुटूंबियांना पकडण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले होते, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या एका सहकाऱ्याने केला आहे. या वृत्तानुसार, 24 फेब्रुवारी रोजी युद्धाला सुरूवात झाल्यानंतर लगेचच रशियाने झेलेन्स्की व त्यांच्या कुटूंबियाना ताब्यात घेण्याचा घाट घातला होता. पण, ते अपयशी ठरले.

TIME नियतकालिकाने इनसाइड झेलेन्स्की वर्ल्ड नामक एक मुलाखत प्रकाशित केली आहे. त्यात झेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ एंड्री यर्मक यांनी रशियन सैनिकांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या कुटूंबियांना पकडण्यासाठी त्यांच्या घरावर धाड टाकल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले -रशियन सैनिक कीव्हमध्ये दाखल झाले होते. त्यांची झेलेन्स्की व त्यांच्या कुटूंबियांना पकडून ठार मारण्याची इच्छा होती. त्यांचे टार्गेट झेलेन्स्की होते. त्यावेळी राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय सुरक्षित स्थळ नव्हते.

17 वर्षीय कन्या व 9 वर्षीय मुलासोबत झेलेन्स्की

एंड्री यर्मक म्हणाले की, रशियन सैनिकांनी दोनवेळा झेलेन्स्कींच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. पण, अध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांचा प्रयत्न उधळवून लावला. ते म्हणाले -त्या रात्रीपूर्वी आम्ही अशा घटना केवळ चित्रपटात पाहिल्या होत्या.

आपल्या संपूर्ण कुटूंबासोबत राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की.
आपल्या संपूर्ण कुटूंबासोबत राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की.

ते म्हणाले -झेलेन्स्कींचे कार्यालय व घराबाहेर गोळ्यांचा आवाज ऐकू येत होता. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष, त्यांची पत्नी, 17 वर्षीय मुलगी व 9 वर्षीय मुलगा आतच होते. सुरक्षा रक्षकांनी गेटवर बॅरिकेड्स व प्लायवूड्सचे बोर्ड लावून परिसर सील केला. तसेच आतील दिवेही विझवले. त्यानंतर झेलेन्स्की व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी तातडीने बुलेट प्रुफ जॅकेट व असॉल्ट रायफलींची व्यवस्था केली. पण, त्यातील अनेकांना शस्त्र चालवता येत नव्हते.

झेलेन्स्की म्हणाले -शत्रूचे पहिले टार्गेट मी

तत्पूर्वी, झेलेन्स्कींनी एका व्हिडिओद्वारे एक भावनिक आवाहन केले होते. ते म्हणाले होते -मी, माझे कुटूंब व माझी मुले सर्वजण युक्रेनमध्ये आहेत. ते गद्दार नाहीत. ते युक्रेनचे नागरिक आहेत. रशियाचे पहिले लक्ष्य मी आहे. रशियाने मला संपवून युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा कट रचला आहे.

युक्रेनच्या अध्यक्षांनी आपला बहुतांश वेळ बंकर्समध्ये घालवत आहेत. ते 3-4 दिवसांनी स्थितीचा आढावा घेण्यासाठी रशियन सैनिकांना हुलकावणी देत बंकर्सच्या बाहेर येतात.
युक्रेनच्या अध्यक्षांनी आपला बहुतांश वेळ बंकर्समध्ये घालवत आहेत. ते 3-4 दिवसांनी स्थितीचा आढावा घेण्यासाठी रशियन सैनिकांना हुलकावणी देत बंकर्सच्या बाहेर येतात.

झुकले नाही झेलेन्स्की

युद्धाला तोंड फुटल्यानंतर अमेरिकेने झेलेन्स्कींना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रस्ताव दिला होता. पण, त्यांनी तो फेटाळून लावला होता. मला पळून जाण्याचा मार्ग नव्हे तर शस्त्र हवेत, असे त्यांनी तेव्हा ठणकावून सांगितले होते. युद्धादरम्यान झेलेन्स्कींना अनेकदा संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला सुमारे 67 दिवस लोटले असून, त्यात दोन्ही देशांचे अमाप नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...