आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russian War Vs Ukrainian Children । Ukrainian Mothers Using These Methods To Save Children From Russian Attack । Russia Ukrain War Situation

युक्रेन युद्धाचा मन हेलावणारा PHOTO:आईला आपल्या मृत्यूची भीती... दूधपिती मुलगी नातेवाइकांपर्यंत पोहोचावी म्हणून पाठीवरच लिहिले नाव आणि नंबर

कीव्ह4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनमधून आणखी एक हृदयद्रावक फोटो समोर आला आहे. या फोटोत डायपर घातलेली एक छोटी मुलगी पाठमोरी उभी आहे. वेरा माकोवी असे या मुलीचे नाव असून तिच्या उघड्या पाठीवर तिचे नाव, नंबर लिहिलेला आहे. हे सर्व तिची आई साशा माकोवी यांनी लिहिले होते. तिच्या आईने हे सर्व बाळाच्या पाठीवर का लिहून ठेवले होते? तर याचं उत्तर आहे की, जर रशियन हल्ल्यात आईचा मृत्यू झाला, तरी या बाळाची ओळख पटू शकेल. समोरच्या व्यक्तीला मूल कोणाकडे सोपवायचे हे यावरून कळेल.

हा व्हायरल फोटो कीव्हमधील मुक्त पत्रकार अनास्तासिया लॅपटिना यांनी ट्विट केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "युक्रेनियन माता त्यांच्या मुलांच्या शरीरावर आपल्या नातेवाईकांची नावे आणि पत्ते लिहीत आहेत, जेणेकरून त्या युद्धात मारल्या गेल्या आणि त्यांची मुले वाचली, तर ती त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचू शकतील. अशा परिस्थितीतही युरोप सध्या गॅसवर चर्चा करत आहे."

आईने सोशल मीडियावर फोटो टाकून व्यक्त केल्या वेदना

साशाने तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या मुलीचा फोटो शेअर केला होता. लॅपटिना यांनी ट्विटरवरच साशाच्या पोस्टचा उल्लेख केला आहे. साशा पोस्टमध्ये तिची वेदना जगासमोर शेअर करत आहे, युद्ध सुरू असताना तिने मुलगी वेराच्या पाठीवर आणि एका कागदावर सर्व काही लिहून ठेवले होते.

मुलांचा सांभाळ व्हावा, म्हणून युक्रेनियन माता वापरत आहेत ही पद्धत

एक आठवड्यापूर्वी, युक्रेनच्या झापोरिझिया येथून आई-मुलाच्या जोडीची अशीच धक्कादायक गोष्ट समोर आली होती. आपला 11 वर्षांचा मुलगा हसन पिसेकाला वाचवण्यासाठी ज्युलिया पिसेकाला त्याला तिच्यापासून दूर दुसऱ्या देशात पाठवणे योग्य वाटले.

स्लोव्हाकियामध्ये आल्यानंतर अधिकाऱ्यांनी हसनला ताब्यात घेऊन पालकांची चौकशी केली. त्यानंतर हातावर लिहिलेल्या फोन नंबरवर फोन करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
स्लोव्हाकियामध्ये आल्यानंतर अधिकाऱ्यांनी हसनला ताब्यात घेऊन पालकांची चौकशी केली. त्यानंतर हातावर लिहिलेल्या फोन नंबरवर फोन करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

जीवाची पर्वा न करता त्यांनी मुलाला पासपोर्ट देऊन ट्रेनमध्ये बसवले आणि हातावर नातेवाइकांचे मोबाइल नंबर लिहून घेतले. हसन पिसेकाने स्लोव्हाकिया या दुसऱ्या देशात जाण्यासाठी एकट्याने ट्रेनने 1,000 किमी प्रवास केला.

लहान मुलांचा ढालीसारखा वापर करताहेत रशियन सैनिक

काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रशियन लष्करावर लहान मुलांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा आरोप केला होता. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल अलेक्झांडर मोतुझ्यानिक म्हणाले - शत्रू युक्रेनियन मुलांचा वापर आपला काफिला, वाहने हलवताना मानवी ढाल म्हणून करत आहेत. इतकंच नाही तर रशियन सैनिकांवर युक्रेनियन महिलांवर अत्याचार आणि बलात्काराचा आरोपही करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...