आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया-युक्रेन युद्धाच्या 36 व्या दिवशी युक्रेनने प्रथमच रशियावर हवाई हल्ले केले. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, युक्रेनच्या 2 हेलिकॉप्टर्सनी शुक्रवारी पश्चिम रशियातील बेलगोरोड शहरावर हवाई हल्ले करुन एक तेल डेपो उद्ध्वस्त केला. या हल्ल्यात 2 जण जखमी झाल्याचा दावा केला जात आहे.
प्रस्तुत युद्धात दोन्ही देशांच्या लष्करासह सर्वसामान्य लोकांचेही मोठे नुकसान होत आहे. युक्रेनच्या प्रोसिक्युटर जनरल कार्यालयाच्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 153 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 245 हून अधिक मुले जखमी झालेत.
रशियाची चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातून माघार
अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, रशियन लष्कराने 24 फेब्रुवारी रोजी चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर नियंत्रण मिळवले होते. आता ते तेथून काढता पाय घेत आहेत. रशियन सैन्य बेलारुसच्या दिशेने जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
अमेरिका दररोज 10 लाख बॅरल कच्चे तेल जारी करणार
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेन हल्ल्यामुळे वाढणाऱ्या तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील 6 महिने दररोज 10 लाख बॅरल तेल जारी करण्याची घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने रशियावरील आर्थिक निर्बंधांमुळे कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे.
इतर अपडेट्स
युक्रेनमनधील नुकसानीवर एक नजर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.