आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाची कोविड लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाचा खून:बेल्टने गळा आवळून केली हत्या, लसनिर्मितीसाठी पुतीन यांनी केला होता सन्मान

मॉस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियामध्ये कोविड-19 ची लस 'स्पुतनिक व्ही' बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांपैकी एक आंद्रे बोटिकोव्ह यांची त्यांच्या अपार्टमेंटमध्ये बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. रशियन माध्यमांनी शनिवारी ही बातमी दिली.

रशियन वृत्तसंस्था टासने रशियन फेडरेशनच्या तपास समितीच्या हवाल्याने म्हटले आहे की, गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथेमॅटिक्समध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करणारे 47 वर्षीय बोटिकोव्ह गुरुवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले.

बोटिकोव्ह यांचे स्पूतनिक लस निर्मितीमध्ये मोठे योगदान होते.
बोटिकोव्ह यांचे स्पूतनिक लस निर्मितीमध्ये मोठे योगदान होते.

स्पूतनिक लस बनवणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी एक होते बोटिकोव्ह

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी विषाणूशास्त्रज्ञांना कोविड लसीवरील कामाबद्दल ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड पुरस्काराने सन्मानित केले होते. अहवालानुसार, 2021 मध्ये स्पुतनिक व्ही लस विकसित करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी बोटीकोव्ह एक होते. रशियातील तपास प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे की, वैज्ञानिकाच्या मृत्यूची हत्या म्हणून चौकशी केली जात आहे.

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, एका 29 वर्षीय व्यक्तीने भांडणाच्या वेळी बोटीकोव्ह यांचा बेल्टने गळा आवळला आणि नंतर पळ काढला. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, खून हा घरगुती गुन्हा होता आणि संघर्षाचा परिणाम होता. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, बोटनिकोव्ह यांचा मृतदेह सापडल्यानंतर लगेचच संशयिताला अटक करण्यात आली.

हल्लेखोराला अटक, कठोर शिक्षेसाठी प्रयत्न

ते म्हणाले, 'हल्लेखोराचे ठिकाण काही वेळातच कळले. आरोपी तरुणाचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, त्याच्यावर यापूर्वीच गंभीर गुन्हा केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. नजीकच्या काळात तपास पथक आरोपीला प्रलंबित खटल्यापर्यंत कोठडीत ठेवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची योजना आखत आहे.

बातम्या आणखी आहेत...