आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युरासिक पार्क अभिनेता सॅम नीलला ब्लड कॅन्सर:अभिनेता म्हणाला- मी मरत आहे, पण आतापर्यंत जीवंत असल्याचा मला आनंद

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्युरासिक पार्क अभिनेता सॅम नीलने ब्लड कॅन्सर थर्ड स्टेजला पोहचला असल्याचे मेमॉयरमध्ये चाहत्यांना सांगितले. मार्च 2022 मध्ये, जुरासिक पार्क डोमिनियनच्या शूटिंगदरम्यान आपल्याल अँजिओइम्युनोब्लास्टिक टी-सेल लिम्फोमा असल्याचे कळाल्याचे त्याने सांगितले.

मी अजूनही जिवंत आहे याचा आनंद आहे - सॅम नील 'ज्युरासिक पार्क डोमिनियन' या चित्रपटात सॅम नीलने डॉ. अॅलन ग्रँटची भूमिका साकारली होती. त्याने आपल्या मेमॉयरची सुरुवात या ओळीने केली आहे की, मी तुला याबद्दल कधी सांगितले आहे का? तर मुद्दा असा आहे की मी मोठ्या संकटात आहे. कदाचित मी मरत आहे. त्यामुळे मला ते (मेमॉयर ) लवकरच पूर्ण करायचे आहे.

सॅम नील कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.
सॅम नील कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.

आठवणीने मला नवीन जीवन दिले

द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की, कॅन्सरवर उपचार सुरू असताना स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी मेमॉयर लिहायला सुरुवात केली. मला पुस्तक लिहिण्याची कधीच इच्छा नव्हती. पण, जेव्हा मी पुस्तक लिहायला सुरुवात केली. तेव्हा मला जगण्याचे एक नवीन कारण सापडले. मी माझ्या आयुष्यातील जास्तीत जास्त अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया माझ्यासाठी संजीवनी ठरली आहे. याशिवाय मी या परिस्थितीला सामोरे जाऊ शकलो नसतो.

गेल्या वर्षीच्या कॅन्सरच्या उपचाराची आठवण करून देताना सॅम म्हणाला की, गेल्या वर्षातील माझ्या आयुष्यातील दिवस सर्वात वाईट होते. परंतु त्या दिवसांमुळे आज मला मिळालेल्या प्रत्येक दिवसासाठी मी स्वता:ला भाग्यवान समजतो.
गेल्या वर्षीच्या कॅन्सरच्या उपचाराची आठवण करून देताना सॅम म्हणाला की, गेल्या वर्षातील माझ्या आयुष्यातील दिवस सर्वात वाईट होते. परंतु त्या दिवसांमुळे आज मला मिळालेल्या प्रत्येक दिवसासाठी मी स्वता:ला भाग्यवान समजतो.

नीलची केमोथेरपी

द गार्डियनच्या वृत्तानुसार, अभिनेता सॅम नीलने कर्करोगाच्या उपचारासाठी केमोथेरपी देखील घेतली होती. परंतु त्याचा फायदा झाला नाही. आता अभिनेता आणखी एक केमोथेरपी औषध घेत आहे, त्याला हे औषध आयुष्यभर घ्यावे लागेल. आता सॅम कॅन्सरमधून थोडा बरा झाला आहे. सॅम नीलने 1979 मध्ये अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 'द पियानो', 'ज्युरासिक पार्क', 'पीकी ब्लेंडर्स' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे.

'ज्युरासिक पार्क डोमिनियन' हा ज्युरासिक वर्ल्ड सीरिजचा अंतिम भाग आहे.
'ज्युरासिक पार्क डोमिनियन' हा ज्युरासिक वर्ल्ड सीरिजचा अंतिम भाग आहे.
बातम्या आणखी आहेत...