आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वुहानच्या हुबई प्रोव्हिन्शियल रुग्णालयातील श्वसनरोग आणि गंभीर रोग तज्ञ डॉ. झांग जिंग्सियान यांनी पहिल्यांदाच शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यांनी कोरोनाच्या पहिल्या दोन वृद्ध रुग्णांविषयी माहिती दिली, ज्यांना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. या जोडप्यासह त्यांचा मुलगाही होता. त्यांच्यानुुसार, हे कुटुंब त्यांच्याकडे डिसेंबर २०१९ मध्ये आले होते. वाचा पहिल्या रुग्णांंबाबतचा अनुभव
२६ डिसेंबरला दोन वृद्ध माझ्याकडे आले. यातील महिलेला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. महिलेचा पती आणि मुलगाही सोबत होते. पतीला अशक्तपणा जाणवत होता, मात्र ताप नव्हता. आम्ही तपासणी केल्यानंतर मुलालाही फुफ्फुसाचा त्रास असल्याचे समोर आले. सामान्यत: या कुटुंबामध्ये फ्लू किंवा निमोनियाचे लक्षणे मला दिसत होती. मात्र त्यांच्या आतड्यांना मोठी इजा झाल्याचे सीटी स्कॅनमध्ये निष्पन्न झाले. मुलाच्या फुप्फुसाचे जास्त नुकसान झाले होते. असे असूनही मुलाने तपासणी करण्यास नकार दिला. कुठलेही लक्षण नसल्यामुळे केवळ पैशांसाठी तपासणी करत असल्याचे मुलाला वाटत होते, मात्र आमच्या दबावानंतर त्याने तपासणीस होकार दिला. मुला मध्येही आई-वडिलांप्रमाणेच लक्षणे असल्याचे अहवालातून समोर आले.
एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना एकाच वेळी सारखाच आजार कसा होऊ शकतो, यामुळे मी चिंतेत होतो. दुसऱ्या दिवशी २७ डिसेंबरला रुग्णालयात आणखी एक रुग्ण आला. या रुग्णातही अशीच लक्षणे आढळली. आम्ही आधी इन्फ्लुएंजा संबंधी अनेक तपासण्या केल्या, मात्र काहीही मिळाले नाही. तेव्हा मी रुग्णालयातील काही वरिष्ठांशी चर्चा करून एक अहवाल तयार केला. यात मी लिहिले, आम्हाला एका संसर्गाविषयी माहित झाले आहे. या प्रकारची आणखी काही प्रकरणे समोर आली आहे. दुसऱ्याच दिवशी याविषयी तपासणी सुरू झाली. ३० डिसेंबरला वुहानमधील सर्व वैद्यकीय संस्थांना सतर्क करण्यात आले. शहरात एका विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ३१ डिसेंबरला चायना नॅशनल हेल्थ कमिशनच्या तज्ञांचे पखक वुहानमध्ये पाठवण्यात आले. सरकारी आणि सर्व लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यास सांगण्यात आले. तोपर्यंत संसर्गाची २७ प्रकरणे समोर आली होती. ३१ डिसेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने ही याबाबत अलर्ट जारी केला. मला वाटलेही नव्हते की माझा अहवालाचा महारीच्या रिपोर्टमध्ये समावेश होईल. जो आता वेगाने पसरतो आहे आणि यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.