आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोत्कृष्ट शहर:खानपान, नाइट लाइफबाबत सॅनफ्रान्सिस्को अव्वल; यादीत न्यूयॉर्क 5 व्या स्थानी, टोकियो 10 व्या क्रमांकावर

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातील 37 उत्तम शहरांच्या टाइम आऊटच्या यादीत देशातील एकही शहर नाही

लाल रंगाचे सेतू, सहजपणे आकर्षित करणारे रेस्तराँ, तंत्रज्ञान उद्योगासाठी प्रसिद्ध अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्कोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. खानपान, संस्कृती व चांगले नाइटलाइफ या श्रेणीत हे शहर जगात सर्वोत्कृष्ट ठरले. आंतरराष्ट्रीय मीडिया संस्था टाइम आऊटद्वारे जारी सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीत त्याला पहिले स्थान मिळाले आहे. त्यानंतर नेदरलँड्सची राजधानी अॅम्स्टरडॅमचा क्रमांक लागतो. कोरोनाकाळात जागतिक पातळीवर २७ हजार पर्यटकांची सामुदायिक भावना, शहरी वातावरण, पर्यावरण व लोकांशी मैत्रीपूर्ण वर्तन इत्यादी निकषांवर ही निवड करण्यात आली आहे. मत घेण्याचा उद्देश सर्वात चांगल्या शहरांची निवड व यादीत कमीत कमी शहरांना स्थान देणे असा होता. जागतिक यादीत भारतीय शहराला मात्र स्थान मिळू शकले नाही. संस्थेच्या म्हणण्यानुसार प्रगतिशीलता, स्वीकार्हता, स्थैर्य यांचा अनोखा मेळ सॅनफ्रान्सिस्कोमध्ये दिसून येतो. महामारीदरम्यान लॉकडाऊन व त्यानंतर तत्परतेने उचललेल्या पावलांना नागरिकांनी नियमांना लागू करण्यास पूर्ण सहकार्य केले.

सर्वाधिक लसीकरणाबद्दलही याच शहराची नोंद झाली आहे. त्यामुळे सॅनफ्रान्सिस्कोचे कौतुक झाले. शहरातील पार्कलेट पाहिल्यावर विशाल स्ट्रीट पार्टीसारखे चित्र दिसू लागते. येथील वातावरण खाद्यसंस्कृतीला पोषक वाटते. दुसऱ्या क्रमांकावर अॅम्स्टरडॅममधील १७ टक्के भाग हरित क्षेत्र आहे. त्यामुळे पर्यटकांना ते आकर्षित करते. येथील लोक आधुनिक, पर्यावरणप्रेमी व शहरातील परिस्थितीबाबत खूप दक्ष वाटतात. तिसऱ्या स्थानी मँचेस्टर आहे. हे रचनात्मक शहर असल्याचे ७१ टक्के लोकांना वाटते. कोपेनहेगनला पाहणीत सामील ६६ टक्के लोकांनी आरामदायी व हरित शहर असे म्हटले आहे. न्यूयॉर्कला लोक सर्वात रोमांचक व नव्या गोष्टींचा शोध घेणारे शहर मानतात. नव्या गोष्टींचा शोध घेणारे शहर म्हणून टोकियो असल्याचेही ८२ टक्के लोकांना वाटते. शहरातील स्वच्छता व शौचालयापर्यंत देशाची कला झळकते.

बातम्या आणखी आहेत...