आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये वाळूच्या वादळाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. AccuWeather च्या माहितीनुसार, हे वादळ गत बुधवारी वायव्य चीनच्या किंघाई प्रांतात धडकले होते. या व्हिडिओमध्ये वाळूचे वादळ वाळवंटातून थेट आकाशाकडे झेपावणारे हे वादळ वेगाने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या दिशेने येताना दिसून येत आहे. या वादळाच्या कानठळ्या बसवणाऱ्या शिट्ट्यांनी वाहनांतील प्रवाशांची भीतीने पाचावर धारण बसल्याचेही दिसून येत आहे.
CNN च्या वृत्तानुसार, वाळूच्या या चक्रीवादळाचा खेळ जवळपास 4 तास सुरू होता. त्याचा सर्वाधिक फटका हाइशी मंगळ व तिबेटी स्वायत्त क्षेत्राला बसला. या वादळामुळे वाहतूक विस्कळीत झाली. तसेच स्थानिक नागरिक व पर्यटकांना सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली.
चांगली गोष्ट म्हणजे, या वादळामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अन्य एका वृत्तात या वादळामुळे दृश्यमानता अवघी 200 मीटर एवढीच उरली होती, असा दावा कर्यात आला आहे.
दुसरीकडे, चीनपुढे वाढत्या तापमानाचे गंभीर आव्हान उभे टाकले आहे. जगातील अन्य देशांसारखाच येथे कडक उन्हाळा असतो. अॅक्युवेदरनुसार, जूनच्या मध्यापासून उत्तर, पूर्व व मध्य चीनच्या एका मोठ्या भागाला वाढत्या तापमानाचा फटका सहन करावा लागत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, चीनला या स्थितीचा आणखी काही दिवस सामना करावा लागेल.
उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा युरोपाचाही पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उष्णतेमुळे स्पेन, फ्रान्स, ग्रीस व इटलीतील जंगलात वणवा भडकला आहे. संयुक्त राष्ट्रानेही याविषयी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.