आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे. पाकिस्तानी वृत्तानुसार दोघेही एकमेकांना घटस्फोट देणार आहेत. सानियाच्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे या चर्चांना उधाण आले होते. सानियाने पोस्टमध्ये लिहिले- Where do broken hearts go. To find Allah ! म्हणजे तुटलेली ह्रदये कुठे जातात, देव शोधायला.
सानियाच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी?
सानिया आणि शोएबच्या नात्यात दरी निर्माण होण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी दोघांनीही आतापर्यंत मौन बाळगले आहे. डेली पाकिस्तान न्यूज वेबसाइटनुसार शोएब एका मुलीला डेट करत आहे. सध्या दोघेही वेगवेगळ्या घरात राहत आहेत.
शुक्रवारी, टेनिसपटूने मुलगा इझानसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'ते क्षण जे मला सर्वात कठीण दिवसांमधून घेऊन जातात. अशा पोस्ट्स सातत्याने येत असल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टेनिसपटू सानिया मिर्झाच्या इन्स्टाग्राम पोस्ट आणि स्टोरी पाहा...
लग्नादरम्यान दोघांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते
2010 मध्ये सानिया-शोएब मलिकचे लग्न झाले. लग्नाच्या 10 वर्षानंतर त्यांचा मुलगा इजहानचा जन्म झाला. सानिया आणि शोएब मलिकची प्रेमकहाणी ही दोन्ही देशांमध्ये खळबळ उडवणारी कथा होती. लग्नाच्या वेळी सानियाच्या देशभक्तीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशा कठीण प्रसंगातून सावरल्यानंतर शोएब-सानियाने केवळ लग्नच केले नाही तर आतापर्यंत त्यांचे नातेही कायम ठेवले आहे.
दोघांची पहिली भेट 2004-2005 मध्ये भारतात झाली होती. मात्र, या भेटीत दोघांमध्ये फारसे बोलणे झाले नाही. काही वर्षांनंतर, 2009-2010 मध्ये, दोघेही ऑस्ट्रेलियन शहरात होबार्टमध्ये एकमेकांना भेटले. सानिया टेनिस खेळण्यासाठी तर शोएब आपल्या संघासोबत क्रिकेट खेळण्यासाठी आला होता. यावेळी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. इथे ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मग भेटण्याची प्रक्रिया सुरू झाली.
हैदराबादमध्ये लग्नाचे विधी नंतर लाहोरमध्ये रिसेप्शन
जवळपास 5 महिने एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 12 एप्रिल 2010 रोजी दोघांचे लग्न झाले. लग्नाचे सर्व विधी हैदराबादमध्ये पार पडले. यानंतर लाहोरमध्ये रिसेप्शन पार पडले. सानियाने तिच्या 'Ace Against Odds' या आत्मचरित्रात लिहिले आहे की, शोएब तिच्या आयुष्यात आला जेव्हा ती तिच्या प्रोफेशनल जीवनातील समस्यांशी झुंजत होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.