आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. हा दावा शोएबच्या जवळच्या मित्राने केला आहे. हा मित्र त्यांच्या मॅनेजमेन्ट टीमचा भाग आहे. त्यांनी म्हटले आहे, 'मी त्या दोघांच्या घटस्फोटाची पुष्टी करू शकतो, पण यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही.'
घटस्फोटाच्या अफवांदरम्यान मॉडेल आयशा कमरसोबतच्या संबंधांविषयी मलिकची एक मुलाखत व्हायरल होत आहे. यामध्ये मलिकने खुलासा केला होता की, फोटोशूटदरम्यान आयशाने मला खूप मदत केली होती. वास्तविक, 2021 मध्ये मलिकने आयशासोबत एक बोल्ड फोटोशूट केले होते. आता हे सर्व फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
सानिया आणि शोएबचे लग्न 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये झाले. 15 एप्रिल रोजी लाहोरमध्ये रिसेप्शन झाले होते. दोघांना इजहान नावाचा एक मुलगा आहे. त्याचा जन्म 2018 मध्ये झाला होता.
आधी शोएब-आयशाचे व्हायरल फोटो पाहा...
सानिया दुबईत, तर मलिक पाकिस्तानात
सानिया-मलिकच्या जवळच्या मित्राने सांगितले की, दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे. काही औपचारिकता आहेत, ज्या अजूनही बाकी आहेत. दोघेही सध्या वेगळे राहतात. सानिया सध्या दुबईत आहे, तर मलिक पाकिस्तानात आहे. घटस्फोटाच्या बातम्यांना सानियाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक हवा मिळत आहे. सानियाने ताज्या पोस्टमध्ये लिहिले होते - 'टूटे दिल कहां जाते हैं?'
आता पाहा सानिया आणि शोएबच्या सोशल मीडिया पोस्ट, ज्यामुळे घटस्फोटाच्या बातम्यांना हवा मिळाली...
सानियाने लिहिले- टूटे दिल कहां जाते हैं...
सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर लेटेस्ट स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये सानियाने स्वतःच प्रश्न केला आणि स्वतःच उत्तर दिले. लिहिले- Where do broken hearts go. To find Allah ! म्हणजे तुटलेले मन कुठे जाते, देव शोधायला. ताटातूट आणि विभक्त होण्याच्या दरम्यान, अशा पोस्टवरून सानियाचे मन दुखावल्याचे दिसून येते. ती दु:खी आहे आणि हे दु:खही व्यक्त करत आहे.
शोएबने लिहिले - आम्ही एकत्र नसलो तरीही...
सानिया आणि शोएब 30 ऑक्टोबरला एकत्र दिसले होते. निमित्त होते मुलगा इजहानच्या वाढदिवसाचे. शोएबने फोटो पोस्ट केला, पण त्याने जे लिहिले त्यावरून लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. शोएबने लिहिले, "जेव्हा तुझा जन्म झाला, तेव्हा आमच्यासाठी जीवन विशेष बनले. भलेही आपण सोबत नसू, कदाचित रोज भेटू होणार नाही, पण तुझ्या आनंदाविषयी आणि तुझ्याविषयी बाबा नेहमी विचार करतील. बाबा आणि आई तुझ्यावर प्रेम करतात."
पाकिस्तानी मीडियाने सांगितले कारण- शोएबने सानियाचा विश्वासघात केला
आतापर्यंत सानिया किंवा शोएबने त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही लिहिलेले नाही. दोघांच्या सोशल मीडिया पोस्टवरून लोक अंदाज लावत आहेत. दोघे वेगळे राहत असल्याचे पाकिस्तानी मीडिया सांगत आहे. मुलाचे संगोपन सोबत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. शोएबने त्याच्या एका टीव्ही शोमध्ये सानियाला धोका दिला होता एवढेच सांगितले जात आहे. मात्र, याबाबत फारसे काही लिहिले जात नाही. शोएब दुसऱ्या कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का? याचाही वृत्तांमध्ये उल्लेख नाही. दोघांनी घटस्फोटाची तयारी सुरू केली आहे, एवढेच बोलले जात आहे.
सानिया ही शोएबची दुसरी पत्नी, पहिल्या पत्नीने लग्नात घातला होता गोंधळ
शोएबची पहिली पत्नी सानिया नसून आयशा सिद्दीकी आहे. 2010 मध्ये सानिया-शोएबच्या लग्नाआधी आयशा मीडियासमोर आली होती. ती शोएबची पत्नी असल्याचे सांगत होती. घटस्फोट दिल्याशिवाय शोएब लग्न करू शकत नाही असे म्हणत होती. मूळची हैदराबादची राहणारी आयशा म्हणाली होती की जाडपणामुळे शोएबला ती आवडत नाही.
सुरुवातीला शोएबने या लग्नाचे वृत्त फेटाळले होते आणि घटस्फोटाबद्दलही तो काहीही म्हणाला नव्हता. मात्र वाद वाढल्यानंतर त्याने आयशाला घटस्फोट दिला. सानियासोबत लग्न झाल्यानंतर हा घटस्फोट देण्यात आला होता.
लग्नापूर्वी शोएब सानियाच्या घरी होता, तेव्हाही वाद झाला होता
लग्नापूर्वी शोएब सानियाच्या घरी राहत होता. यावरूनही वाद निर्माण झाला होता. मुस्लीम धर्मगुरूंनी लग्नापूर्वी वधूच्या घरी राहणे इस्लामच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सानियाच्या घरातील लोकांनी ठरवले की, शोएबने लग्नाच्या एक दिवस आधी हॉटेलमध्ये शिफ्ट व्हावे. तसेच झाले.
मीडियामुळे शोएबला तिथून निघणे कठीण झाले, त्यानंतर सानियाचे काका जोरजोरात ओरडू लागले. असे वाटले की घरात भांडण झाले आहे. मीडियाने त्यांना घेरले तेव्हा शोएब एका छोट्या गाडीत शांतपणे खाली झोपून हॉटेलमध्ये पोहोचला. सानियाने सांगितले होते की, या कारचा उपयोग भाजीपाला आणि सामान घरात आणण्यासाठी केला जातो होता.
आता सानिया मिर्झाच्या पोस्ट पाहा, ज्यातून सर्व काही ठिक नसल्याचेच दिसत आहे...
1. कठीण काळात सोबतीचे क्षण...
2. तुमच्यासाठी काय चांगले, हे देवाला माहिती आहे...
3. आप अपने लिए स्पेस चाहते हैं, हम अपनी रूह की फुसफुसाहट सुनते हैं...
5 महिन्यांच्या डेटिंगनंतर लग्न, 10 वर्षांनी मुलगा झाला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.