आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन शोध:इलेक्ट्रिक कुकरमध्ये 50 मिनिटांत सॅनिटाइज होतो एन-95 मास्क, 4 स्टेपमध्ये घरातच मास्कचा परत वापर करू शकता

वॉशिंगटनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेतील 150 वर्षे जुन्या इलिनोइस यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा दावा

कोरोना काळात सर्वत्र चर्चा झाली, एन-95 मास्कची याच एन-95 मास्कला इलेक्ट्रिक कुकरच्या मदतीने फक्त 50 मिनिटांत सॅनिटाइज करता येते. हा दावा अमेरिकेतील 150 वर्षे जुन्या इलिनोइस यूनिव्हर्सिटीने केला आहे. संशोधकांनी सांगितले की, जर एन-95 मास्कला 50 मिनिटापर्यंत 100 डिग्री सेल्सियस तापमानानर कुकरमध्ये ठेवल्यास मास्क किटाणुमुक्त होतो. यादरम्यान मास्कच्या फिल्टरचे कोणत्याच प्रकारचे नुकसान होत नाही. मास्क सॅनिजाइज करण्यासाठी कोणत्याच रसायनाची गरज नाही, फक्त एका टॉवेलची गरज आहे.

मास्कचा परत वापर करू शकता

एन्वायर्नमेंट सायंस अँड टेक्नोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, एन-95 मास्कला कुकरमध्ये सॅनिजाइज करुन परत वापर करू शकता. संशोदक हेलेन नगुयेननुसार, कपड्याचा किंवा सर्जिकल मास्क आपल्याला ड्रॉपलेट्सपासून वाचवतो पण, रेस्पिरेटर मास्क म्हणजेच एन-95 व्हायरसच्या लहानातल्या-लहान कणापासून आपले रक्षण करतो.

संशोधक हेलेन नगुयेन
संशोधक हेलेन नगुयेन

या स्टेपमधून करा मास्क सॅनिजाइज

#1) इलेक्ट्रिक कुकरमध्ये पाणी नसावे.

#2) कुकरमध्ये टॉवेलची घडी घालून टाका.

#3) कुकरचे तापमान 50 मिनीटांसाठी 100 ड्रिग्री सेल्सियस करा.

#4) 50 मिनीटानंतर याला थंड करा आणि मास्कचा वापर करा.

बातम्या आणखी आहेत...