आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेना लसीच्या आघाडीवर दाेन झटके बसले आहेत. फ्रेंच फार्मा कंपनी सनाेफीची लस वर्षाखेरीस येणार नाही. आॅस्ट्रेलियात तयार हाेणारी लस फाॅल्स एचआयव्ही पाॅझिटिव्ह रिझल्ट देत असल्याने रद्द करावी लागली आहे. क्वीन्सलँड व सीएसएल यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. आॅस्ट्रेलिया सरकारने या लसीचे ५ काेटी डाेस बुक करण्यात आल्याचे म्हटले हाेते.
फ्रेंच कंपनी सनाेफी व ब्रिटनची बहुराष्ट्रीय फार्मा कंपनी जीएसकेच्या म्हणण्यानुसार त्यांची काेराेना लस २०२१ च्या अखेरीस तयार हाेण्याची शक्यता आहे. ताेपर्यंत लस येणार नाही. ही घाेषणा लसीचे अंतिम परीक्षण करण्यात आल्यानंतर झाली आहे. या लसींचा परिणाम वयस्कर रुग्णांवर कमी प्रमाणात हाेत असल्याचे परीक्षणादरम्यान आढळून आले आहे. म्हणजेच अशा वयाेगटातील लाेकांना सुरक्षेची खात्री या लसीद्वारे मिळत नसल्याचे सिद्ध झाले. म्हणूनच या लसीला २०२१ च्या अखेरच्या तिमाहीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. याआधी ही लस पुढील वर्षीच्या मध्यावर येईल, असे अपेक्षित हाेते. या लसीचा डाेस दिल्यानंतर मिळणारा इम्युन रिस्पाॅन्स हा काेराेनातून बरे झालेल्या १८ ते ४९ वयाेगटातील लाेकांच्या राेगप्रतिकार शक्तीसारखा वाटू लागला आहे. परंतु जास्त वयाच्या लाेकांतील प्रभाव कमी आहे.
या अभ्यासाचा पुढील टप्पा फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरू हाेणार आहे. सनाेफीचे उपाध्यक्ष थाॅमस ट्रायाेंफे म्हणाले, आम्हाला पुढील मार्ग दिसू लागला आहे. आम्ही काेराेना विषाणूच्या विराेधात प्रभावी व सुरक्षित लस देऊ याची आम्हाला खात्री आहे. काेणतीही एक फार्मा कंपनी संपूर्ण जगासाठी लसनिर्मिती करू शकत नाही. म्हणूनच जगासाठी एकापेक्षा जास्त लसींची गरज आहे.
जीएसके अध्यक्ष राॅजन काेनर म्हणाले, लसीच्या परीक्षणाचा निकाल अपेक्षित राहिला नाही, परंतु सनाेफीसाेबत कंपनी प्रभावी लसनिर्मिती करेल.
या चार लसींनी जागवल्या आशा, दाेनचा वापरही सुरू : आतापर्यंत स्पुटनिक-५, फायझर-बायाेएनटेक, माॅडर्नाच्या लसीने ९० टक्क्यांहून जास्त प्रभाव असल्याचा दावा केला आहे. स्पुटनिक-५ चे रशियात, फायझर-बायाेटेकचा ब्रिटनमध्ये वापर सुरू आहे. त्याशिवाय भारतात तयार हाेणारी आॅक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीनेदेखील ७० टक्के प्रभाव दाखवून दिला आहे. आता स्पुटनिक व आॅस्कफाेर्सच्या लसीचे संयुक्त परीक्षणदेखील केले जाणार आहे, असे वृत्त आहे.
जगभरात सलग तिसऱ्या दिवशी काेराेनामुळे 12 हजारांहून जास्त मृत्यू
जगातील काही देशांत भलेही काेराेना लसीकरणाचा टप्पा सुरू झाला असला तरी महामारीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी काेराेनामुळे जगभरातील मृतांचा आकडा १२ हजारांहून जास्त राहिला. गुरुवारी १२ हजार ७०५ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी १२ हजार ३५१, मंगळवारी १२ हजार ४७ जणांचा मृत्यू झाला हाेता. गुरुवारी अमेरिकेत सर्वाधिक २ हजार ९७४ मृत्यू झाले हाेते. इटलीत ८८७, ब्राझील-७६९, रशियात ५६२ जणांचा मृत्यू झाला हाेता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.