आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर्मनीत संस्कृत शिकण्याचा कल वाढत आहे. येथे कमीत कमी १२ जर्मन विद्यापीठांत संस्कृत शिकवले जाते. प्रत्येक सत्रात सुमारे २०० विद्यार्थी संस्कृतला पर्यायी भाषेच्या रूपात शिकताहेत. जर्मन विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका, कॅनडा व भारतातही संस्कृतचे उन्हाळी अभ्यासक्रम घेतले जात आहेत. हीडलबर्ग विद्यापीठातील आनंद मिश्र कॉम्प्युटेशनल भाषाशास्त्र व क्लासिकल इंडोलॉजी डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘संस्कृत व्याकरणाच्या पाणिनी सिस्टिम मॉडेल’वर प्रबंध लिहिला. गणितीय श्रेणी व तार्किकसंदर्भाने या मॉडेलच्या शाब्दिक प्रतिनिधित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मिश्र म्हणाले, संस्कृत हे संगणकीय भाषेचे उत्तम साधन असू शकते. या विद्यापीठाचा संस्कृत कार्यक्रम २०१७ मध्ये सुरू झाला. संस्कृतच्या विविध पैलूंवर संशोधन सुरू आहे. विद्यापीठ ‘वाराणसीत संस्कृतची जिवंत संस्कृत’ हा कोर्स चालवते. येथे जर्मन व भारतीय विद्यार्थी संस्कृत शिकतात. डॉ. सदानंद दास लीपजिंग विद्यापीठात संस्कृत शिकवण्यासाठी सुरू केलेले समर स्कूल चालवतात. त्यांच्या मते ते जगभरात सर्वाधिक मागणी असलेला संस्कृत अभ्यासक्रम शिकवतात. ज्युलिया म्हणते, संस्कृत संगीतासारखी सरळ भाषा आहे.
संस्कृत दिनानिमित्त जर्मनीत जलसा : दरवर्षी संस्कृत दिनाला (१२ ऑगस्ट) जलसा होतो. यात विद्यार्थ्यांसोबत भारतीय विद्वान संस्कृत ग्रंथ वाचतात. मूळचे जर्मन मॅक्सस मुलर ऋग्वेदाचे भाषांतर करणारे पहिले व्यक्ती होते. जर्मन कवी जोहान वोल्फगँग वॉन गोएथे इतके प्रभावि झालेत की त्यांनी संस्कृत शिकण्याचा निर्णय घेतला. १८२३ मध्ये संस्कृतचे प्रा. ऑगस्ट विल्हेम यांनी गीतेचे लॅटिन भाषांतर केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.