आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड:सौदी अरेबियाने भारतासह 16 देशांच्या प्रवासावर घातली बंदी

रियाधएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड-१९ चा वाढता संसर्ग पाहता सौदी अरेबियाने आपल्या नागरिकांना भारतासह १६ देशांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. गेल्या काही महिन्यांत कोरोना संसर्गाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला आहे. गल्फ न्यूजनुसार, सौदी अरेबियाने भारताशिवाय लेबनॉन, सिरिया, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, येमेन, सोमालिया, इथियोपिया, कांगो, लिबिया, इंडोनेशिया, व्हियतनाम, आर्मेनिया, बेलारूस आणि व्हेनेझुएलाच्या प्रवासावर बंदी घातली आहे. सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सबाबत चिंता व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...