आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Hajj Breaking : Saudi Arabia Hajj 2020 Latest News Updates | Saudi Arabia Hajj Ministry Banned International Islamic Pilgrimage Visitors

हज यात्रा:केवळ सौदीत राहणाऱ्या मर्यादित लोकांनाच करता येणार हज यात्रा; महाराष्ट्रातील 10500 लोकांना थेट बँक खात्यात रिफंड

मुंबई / रियाध2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संभ्रम असताना काहींनी ऑनलाईन माध्यमातून रिफंड मागवले
  • या वर्षी महाराष्ट्रातून 10500 लोक करणार होते हज यात्रा, सर्वांना रिफंड

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदा केवळ सौदी अरेबियात राहणाऱ्यांनाच हज यात्रा करता येणार आहे. यापूर्वी हज रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात होते. त्यामध्ये आता हा बदल करण्यात आला आहे. परदेशातून येऊ इच्छित असलेल्या लोकांना यावर्षी हज यात्रा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी हज यात्रा करणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, गतवर्षी 25 लाख लोक यामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, भारतातून हज यात्रेसाठी पैसे जमा केलेल्या 2.3 लाख लोकांना त्यांचे पैसे बँक खात्यात परत मिळणार आहेत असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

2.3 लाख भारतीयांना मिळेल रिफंड

केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी सांगितले, "महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भारतीयांना हज यात्रेवर पाठवले जाणार नाही असे निर्णय झाला आहे. सौदी अरेबियाच्या हज मंत्र्यांनी सोमवारी रात्रीच हज यात्रा परदेशींसाठी रद्द झाल्याची माहिती दिली होती. सोबतच, यावर्षी भारतीयांना पाठवू नये असा सल्ला दिला होता." विशेष म्हणजे, हज यात्रा करण्यासाठी ज्या भारतीयांना पैसे जमा केले आहेत, ते आपले पैसे परत घेऊ शकतात असे काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.

थेट बँक खात्यात मिळेल रिफंड

हज यात्रा रद्द झाल्यानंतर पेमेंटचे काय होईल याची माहिती महाराष्ट्रातील फेडरेशन ऑफ हज पिलग्रिम्स सोशल वर्कर्सचे महासचिव शेख फैसल यांनी दिली. त्यानुसार, हज यात्रा करण्यासाठी ज्या भारतीयांना पैसे जमा केले आहेत, ते आपले पैसे परत घेऊ शकतात असे काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. यासाठी लोक हज कमिटीच्या वेबसाइटवर जाउन कॅन्सलेशन फॉर्म भरत होते. यात त्यांच्या बँक खात्याची खात्री पटल्यानंतर रिफंडची प्रक्रिया सुरू केली जात होती. परंतु, आता हज यात्रा रद्दच झाल्याने भारतातून हज यात्रेसाठी ज्या-ज्या लोकांनी बुकिंग केली होती, त्या सर्वांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. बुकिंग करताना जे बँक डीटेल देण्यात आले होते, त्यामध्ये हे आपो-आप जमा होणार आहेत अशी माहिती शेख यांनी दिली.

महाराष्ट्रातून जाणार होते 10500 हज यात्री

स्पष्ट निर्देश मिळत नसल्याने हज कमिटीने शुक्रवारीच हज यात्रेसाठी बुकिंग केलेल्या अनुयायींना रिफंड देणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी महाराष्ट्रातून 10,500 लोक हजला जाणार होते. यापैकी काहींनी ऑनलाइन प्रक्रियेतून बुकिंग रद्द करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर ज्यांंनी रिक्वेस्ट केलेली त्या उर्वरीत लोकांचे सुद्धा रिफंड थेट बँकेत जमा होणार आहेत.

लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल -सौदी अरेबिया

सौदी अरेबियाच्या हज मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सौदी अरेबियातील लोकांना हज करण्याची परवानगी दिली जात असली तरीही त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. सुरक्षेचे सर्व मापदंड ठरवूनच हज यात्रा केली जाईल. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगसह सॅनिटायजेशन आणि इतर गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष घातले जाईल. सौदी अरेबियात आतापर्यंत कोरोना संक्रमाणाची 1.61 लाख प्रकरणे समोर आली आहेत. यातील 1 लाख 5 हजार लोक पूर्णपणे बरे झाले. तर कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या तांची संख्या 1307 आहे.

सौदी अरेबिया सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, यावर्षी सुद्धा 20 लाखांपेक्षा अधिक लोक जगभरातून सौदी अरेबियातील मक्का मदीना शहरात येणार असा अंदाज होता. परंतु, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी त्यांना आता परवानगी दिली जाणार नाही. मुस्लिम धर्मातील 5 तत्वांपैकी एक हज सर्वात पवित्र यात्रा मानली जाते. हज प्रकरणातील मंत्री मोहंमद सालेह बंतेन यांनी एप्रिलमध्येच सांगितले होते, की यावर्षी हज यात्रा रद्द केली जाऊ शकते. त्यावेळी फेब्रुवारीत होणाऱ्या उमरा (ठराविक कालावधी व्यतिरिक्त होणारी हज यात्रा) रद्द झाले होते.

बातम्या आणखी आहेत...