आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सौदीत उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांची बस ब्रेक फेल झाल्याने उलटली; 20 जणांचा मृत्यू तर 29 जखमी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौदी अरेबियामध्ये उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांची बस उलटली आहे. यामध्ये 20 जणांचा मृत्यू तर 29 जखमी झाले आहेत. बस प्रवाशांना उमराहसाठी मक्काला घेऊन जात होती. तेव्हाच असीर प्रांताजवळ ब्रेक फेल झाल्याने पुलाच्या कठड्याला धडकल्याने बस पलटली.

बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला.
बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला.

माध्यमांनुसार, बसमधील प्रवाशी हे वेगवेगळ्या देशांमधील होते. दरम्यान, बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

बचाव पथक घटनास्थळी पोहचले. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बचाव पथक घटनास्थळी पोहचले. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उमराहसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे
26 मार्च रोजी सौदी सरकारने उमराहसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. हाजी रमजान महिन्यात फक्त एकदाच उमराह करू शकतात, असे सरकारने जाहीर केले होते. कोणत्याही यात्रेकरूला दोनदा उमराह करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हाजींची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे हज आणि उमराह मंत्रालयाने म्हटले आहे.

सर्व प्रवाशांनी उमराहसाठी निश्चित केलेल्या वेळेची मर्यादा पाळावी, असे सौदी सरकारने मार्गदर्शक तत्त्वात म्हटले. तसेच, केवळ परवानग्यांसाठी नुसुक अॅप वापरा. यामुळे जर एखादा प्रवासी उमराहसाठी जाऊ शकला नाही, तर तो परमिट रद्द करू शकतो.

उमराह म्हणजे काय?
उमराह ही हजसारखीच मुस्लिम धार्मिक तीर्थयात्रा आहे. सौदी अरेबियामध्ये यात्रेकरू हजच्या वेळी वगळता कधीही उमराहसाठी जाऊ शकतात. मात्र, रमजान महिन्यात गर्दी असते. या प्रवासासाठी 15 दिवसांची मुदत आहे. उमराहच्या दिवसांमध्ये यात्रेकरू मक्कामध्ये सुमारे आठ दिवस आणि मदिनामध्ये सात दिवस घालवतात.

सौदी अरेबियाच्या बाहेरील प्रवाशांना उमराहसाठी विशेष व्हिसाची आवश्यकता असते. हा व्हिसा एका महिन्यासाठी वैध आहे. सौदी अरेबियाच्या आसपास राहणारे लोक कोणत्याही विशेष कागदपत्रांशिवाय उमराह करू शकतात.

सरकारने रमजानसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

अरेबिया सरकारच्या इस्लामिक मंत्रालयाने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यामध्ये रमजानच्या काळात लाऊड ​​स्पीकरद्वारे नमाज पठण आणि मशिदींमध्ये इफ्तार मेजवानीवर बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या इस्लामिक मंत्रालयाने रमजानच्या निर्बंधांशी संबंधित 10 सूचना जारी केल्या आहेत. तसेच रमझान दरम्यान मेजवानीसाठी देणगी मागण्यास मनाई आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

रमजान विशेष:खजुराची मागणी वाढली

पवित्र रमजान महिन्यानिमित्त शहरात 100 टन खजूर विक्रीसाठी आला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असला तरी बाजारपेठेत सध्या त्याची कुठलीही कमतरता नाही. लवकरच सौदी अरेबिया, इराण, इराकमधून खजुराची आवक वाढणार आहे. त्यामुळे किमान 300 टन पेंडखजूर विक्री शहरात होईल. सध्या 50 पेक्षा जास्त प्रकारचा खजूर बाजारपेठेत आलेला आहे. जॉर्डनच्या मेटजोलसह मदिनाच्या ऑर्गेनिक खजुराची मागणीही वाढली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.