आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • School | Corona | Lockdown | Shortage Of Full time Teachers In American Schools, Many Schools Canceling Classes, Now Pre study

दिव्य मराठी विशेष:अमेरिकन शाळांत पूर्णवेळ शिक्षकांचा तुटवडा, अनेक शाळांनी वर्ग रद्द केले, आता अध्ययन पूर्वपदावर

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील हटिंग्टन शहरातील प्राथमिक शाळेत पूर्णवेळ शिक्षकांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक शिक्षक सुटीवर गेले आहेत. काहींनी नाेकरी साेडली आहे. त्यामुळे शाळांना वर्ग रद्द करावे लागले आहेत. रिमाेट क्लासेसमध्ये अडचणी येत हाेत्या.

शिक्षकांचा तुटवडा जाणवत असल्याने शाळांनी पर्यायी शिक्षक पदाची व्यवस्था केली. मात्र आता अशा प्रकारच्या शिक्षकांना खूप मागणी आहे. म्हणूनच अनेक शिक्षकांनी अशा पदासाठी अर्ज करायला सुरुवात केली आहे. अशा शिक्षकांना शाळांमध्ये जास्त तासिका मिळू लागल्या आहेत.

त्यातून त्यांच्या वेतनातही वाढ झाली. अमेरिकेत पर्यायी शिक्षक पदासाठी त्यासंबंधी अर्हता असलेले लाेक आपला अर्ज शाळेकडे आधीच देऊन ठेवतात. मग शाळेच्या गरजेनुसार त्यांना संधी दिली जाते. त्यातही पूर्णवेळ काम करू इच्छिणाऱ्यांना नाेकरी दिली जाते.

याच काळात अमेरिकेत काेराेना संसर्ग व इतर सुट्यांमुळे अनेक राज्यांत पूर्णवेळ शिक्षकांची तुटवडा जाणवू लागला आहे. आता शाळांनी महाविद्यालयीन पदवीची अट शिथिल केली आहे. नव्या व्यवस्थेनुसार शाळांचे व्यवस्थापन सुरू आहे.

काही शिक्षणतज्ज्ञ, अनेक पालकांचा पर्यायी शिक्षण व्यवस्थेला विराेध

अमेरिकेत मिसाेरी व ऑरेगाॅन राज्यात पर्यायी शिक्षक पदासाठी यापुढे पदवी अनिवार्यता राहणार नाही. परंतु या व्यवस्थेवरून काही शिक्षणतज्ज्ञ तसेच अनेक पालकांनी विराेध केला आहे. केवळ क्लासेसला नियमित करण्याच्या नावाखाली अशा प्रकारच्या पर्यायी शिक्षकांमधील अर्हतेमध्ये सवलत दिली जाऊ शकत नाही.

कारण तसे केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर प्रतिकूल परिणाम पडू शकताे. शिक्षणासाठी प्रशिक्षित व महाविद्यालयीन पदवीची अनिवार्यता लागू केली जावी. शाळांनी पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती केली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...