आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Schoolgirls In Arab Countries Are Ahead Of Boys In Studies, Yet They Have Very Few Opportunities, Girls Are Ahead Of Boys In International Exams

शिक्षण:अरब देशांतील शाळकरी मुली अभ्यासात मुलांच्या पुढे, तरीही त्यांना फार कमी संधी, आंतरराष्ट्रीय परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुलीच पुढे

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरब देशांमध्ये मुलांपेक्षा मुली शाळेत जाण्याची शक्यता कमी आहे. पण, अभ्यासात त्या मुलांपेक्षा पुढे आहेत. जगात इतरत्र कुठेही अशी परिस्थिती नाही. महिलांवरील दडपशाही आणि शालेय शिक्षणातील मुलांची दुर्बलता यामुळे अरब देशांची अर्थव्यवस्था मागे पडली आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय परीक्षेत अरब देशांच्या मुला-मुलींची कामगिरी चांगली नाही.

जागतिक बँकेचे म्हणणे आहे की, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील दहा वर्षांच्या मुलांपैकी दोनतृतीयांश मुले सामान्य कथा वाचू शकत नाहीत. त्या तुलनेत निम्म्या मुलींनाच हे जमत नाही. २०१९ मध्ये ४० देशांमधील १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय चाचणीनुसार, आठ अरब देशांतील शाळांमध्ये विज्ञानातील मुला-मुलींच्या पातळीतील सर्वात मोठा फरक आढळून आला. ओईसीडी या सर्वात श्रीमंत देशांच्या गटाने १५ वयोगटासाठी दर तीन वर्षांनी घेतलेल्या चाचण्यांमध्ये अरब मुलींनी मुलांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे.

मुला-मुलींच्या स्वतंत्र शिक्षणाचीही समस्या आहे. अरब देशांत, विशेषतः आखाती देशांत मुले-मुली वेगवेगळ्या शाळांत शिकतात. मुलांच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध नाहीत. सौदी अरेबियातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या शाळेत शिक्षकाच्या नोकरीसाठी दहा अर्ज सहज येतील. मुलांच्या शाळेसाठी तीन-चारच अर्ज येतात. आखाती देशांमध्ये पुरुष अधिक पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी सैन्यात किंवा पोलिसांत जातात.

केवळ २०% महिलांकडे नोकऱ्या
शाळेत अव्वल गुण मिळवूनही महिलांसाठी नोकऱ्या आणि कामाच्या संधी नाहीत. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत फक्त २०% महिलांकडे नोकऱ्या आहेत. क्षेत्राबाहेरील संशोधन सांगते की, जे पुरुष कमी शिकलेले आहेत ते स्त्रियांकडे तुच्छतेने पाहण्याची शक्यता जास्त असते.

बातम्या आणखी आहेत...