आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Schools And Colleges Are Closed, Burqa Shops Are Opening; Mom Thinks Wearing A Burqa Will Save Me From The Taliban; News And Live Updates

अनुभवकथन:शाळा-महाविद्यालये बंद, बुरख्याची दुकाने सुरू होत आहेत; आईला वाटते, बुरखा घालून मला तालिबानपासून वाचवेल

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबान अफगाणिस्तानात परत येताच महिलांच्या दुर्दशेच्या कहाण्या येऊ लागल्या समोर

काबूलवर नियंत्रण मिळवल्यानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण झाले आहे. देशातील ३०० पेक्षा जास्त जिल्ह्यांवर सध्या तालिबानचे नियंत्रण झाले आहे. देशाच्या ७५% भाग आता तालिबानने ताब्यात घेतला आहे. याबरोबरच अफगाणिस्तानात मोठा विनाश, महिलांवर प्रतिबंध आणि नरसंहाराचा काळ पुन्हा एकदा परतला आहे. तालिबानने महिलांवर प्रतिबंध लादणे सुरू केले आहे. त्यांच्या शिकण्यावर, शाळा- महाविद्यालयात जाण्यावर आणि नोकरीवर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भिंतीवरून महिलांच्या जाहिराती काढून टाकल्या जात आहेत. पुरुषांशिवाय घरातून निघण्यासही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. महिलांना बुरखा घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर तालिबानचा आदेश न ऐकल्यास कठोर शिक्षा केली जात आहे. यातच महिला स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि आपले दु:ख मांडत आहेत.

अफगाणिस्तानची फॅशन छायाचित्रकार फातिमा म्हणते, अफगाणी महिलांना जगातील सर्वात स्टायलिश महिलांमध्ये गणले जाते. मात्र, तालिबान परतल्याने त्यांना पुन्हा एकदा बुरख्यात राहावे लागत आहे. विद्यापीठात शिकणारी २६ वर्षाची हबीबा सांगते, मी आणि माझ्या बहिणीने बुरखा घालावा म्हणून माझी आई विनवणी करत आहे. आईला वाटते की, आम्हाला बुरखा घालून तालिबानपासून वाचवता येईल. मात्र, आमच्या घरात बुरखाच नाही आणि मलाही बुरखा विकत घ्यायचा नाही. मला एका पडद्यासारख्या कापडामागे राहायचे नाही. बुरखा घालण्याचा अर्थ असेल की मी तालिबानची सत्ता स्वीकारली असून मी त्यांना माझ्यावर नियंत्रणाचा हक्क दिला आहे. ज्यासाठी मी एवढे कठोर परिश्रम घेतले ते माझ्यापासून हिरावले जाईल, अशी भीती मला आहे. २२ वर्षांची आयशा काबूल विद्यापीठात इंटरनॅशनल रिलेशन्सचा अभ्यासक्रम करत आहे. ती म्हणते, माझे अखेरचे सत्र पूर्ण होण्यात अवघे दोन महिने राहिले आहेत. आता मी ते बहुतेक पूर्ण करू शकणार नाही. लोकांना धक्का बसला आहे.

वर्ल्ड मीडियात जो बायडेन यांच्यावर टीका, अमेरिकेने प्रतिष्ठा गमावल्याचे म्हटले
न्यूयॉर्क टाईम्स -
अमेरिकेच्या वृत्तपत्राने लिहिले, अमेरिकेच्या अनुभवाचा अखेरचा भाग लज्जास्पद लिहिणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन यांची नोंद होईल. ४० दिवसांपूर्वी त्यांनी सांगितले होते, अफगाणमध्ये लोकांना छतावरून एअरलिफ्ट केले जात असल्याचे तुम्ही पाहणार नाहीत. मात्र, रविवारी असे दिसले. वकिलातीत काम करणाऱ्यांना अॅम्बेसीजवळच्या लँडिंग पॅडवरून लिफ्ट करावे लागले.

पॉलिटिको - बेल्जियमच्या मासिकाने लिहिले, बायडेन जेव्हा व्हाइट हाऊसमध्ये आले तेव्हा ते म्हणाले होते, जगाच्या मंचावर अमेरिका परतला आहे. ओव्हल ऑफिसमध्ये ते त्यांचे परराष्ट्र धोरणाचे मूळ तत्त्व घेऊन आले आहेत. मात्र, अफगाणिस्तानातून सेना परत बोलावण्याच्या परराष्ट्र धोरणाचा निर्णयच गैरसमज असलेला आहे. सैन्य परतीचा निर्णय योग्य होता का, हा प्रश्न इतिहासात नोंदवला जाईल.

डायचे वेले - जर्मन मीडियाने लिहिले, अमेरिकी लष्कर परतल्याने अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण झाले आणि खळबळ माजली. यामुळे अफगाणिस्तानबाबत अमेरिकेचा दृष्टिकोन पूर्णपणे चुकल्याचे स्पष्ट झाले. अमेरिका त्यांची प्रतिष्ठा हरला. अमेरिकी वेबसाइट सीएनएनने लिहिले, अफगाणमधून लष्कर परतणे बायडेन यांच्यासाठी राजकीय भूकंप ठरेल.

द गार्डियन - ब्रिटिश वृत्तपत्राने लिहिले, बायडेन यांचा पराभव म्हणून याकडे पाहिले जाईल. अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याचे परतणे व तालिबानी नियंत्रणानंतर अल कायदा पुन्हा वाढला तर अमेरिकेचे लोक माफ करणार नाहीत. विरोधक सवाल करतील की, अफगाणिस्तान कोण हरले? हे योग्य नाही, मात्र हा बायडेन यांचा पराभव आहे. त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. ती त्यांना दीर्घकाळ त्रास देईल.

  • अफगाणिस्तानची लोकसंख्या सुमारे ४.०३ कोटी आहे. यात ५१.७% पुरुष, तर ४८.३०% महिला आहेत.
  • अफगाणिस्तानात काम करणाऱ्या महिलांची संख्या २१.६२% आहे, त्या खासगी व सरकारी सेवेत आहेत.
  • महिला साक्षरतेचे प्रमाण २४.२% आहे, तर विद्यापीठात प्रवेश घेण्याचे प्रमाण २१% आहे.
  • अफगाण राष्ट्रीय सुरक्षा दलात महिलांची संख्या २०१२ मध्ये २ हजार होती. यात १५७० पोलिस व ४६५ लष्करात.
  • ५२ महिला वायुदलातही होत्या. निलोफर रहमानी पहिली महिला वैमानिक होती.

तालिबानने ३४ प्रांतांच्या राजधान्या दोन आठवड्यांत आपल्या ताब्यात घेतल्या. फक्त ९० हजार तालिबान बंडखोरांसमोर ३ लाखांपेक्षा जास्त संख्येच्या अफगाण लष्कराला शरण यावे लागले. म्हणजे २० वर्षांपूर्वी ज्या तालिबान सत्तेचा अंत झाला होता ते पुन्हा आले आहे. तालिबानशी संबंधित प्रश्न- उत्तरे...

१९८० च्या सुरुवातीला सोव्हिएत सैन्याच्या संरक्षणात अफगाण सरकार काम करत होते. अनेक मुजाहिदीन गट सेना व सरकारविरोधात लढत होते. त्यांना अमेरिका व पाकची मदत होत होती. यामुळे सोव्हिएत सैन्य परतले. मग मुजाहिदीनचा कमांडर झाला पश्तून मुल्ला मोहंमद उमर. त्याने १९९४ मध्ये तालिबान नावाने संघटना स्थापन केली. पश्तूनचा अर्थ आहे विद्यार्थी.

तालिबान कसे काम करते?
सुरुवातीला तालिबानचा हेतू होता पश्चिमेतील देशांच्या सत्तेचा प्रभाव नष्ट करणे आणि देशात इस्लामी शरिया कायदा आणणे. त्यानंतर क्रूर चेहरा समोर आला. तालिबानची संघटनात्मक रचना सरकारसारखी आहे. यात संघटनेचा प्रमुख, ३ उपप्रमुख आहेत. नेतृत्व करणाऱ्या परिषदेला रहबरी शूरा म्हणतात. त्यानंतर विभागांचे कमिशन आहे. सर्व प्रांतांसाठी वेगळे गव्हर्नर व कमांडर आहेत. निर्णय घेणाऱ्या लीडरशिप कौन्सिलमध्ये २६ सदस्य आहेत, ते मंत्रिमंडळासारखे आहेत. मुख्यालय पाकिस्तानच्या क्वेटा शहरात आहे.

तालिबान किती श्रीमंत आहे?
२०१६ मध्ये फोर्ब्जने त्यांचा वार्षिक व्यवसाय २९६८ कोटी रुपये म्हटला होता. रेडिओ फ्री युरोपनुसार २०१९-२० मध्ये तालिबानचे वार्षिक बजेट सुमारे ११ हजार कोटी रुपये होते. उत्पन्नाचे साधन अफू तस्करी, सीमा चौकी व खाण कंपन्यांकडून वसुली आहे.

तालिबानचे नेतृत्व आता कोण करत आहे?
आधी मुल्ला उमर आणि नंतर २०१६ मध्ये मुख्तार मन्सूरचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यूनंतर मौलवी हिब्तुल्लाह अखुन्जादा तालिबानप्रमुख आहे.

२० वर्षांनंतर एवढा मजबूत कसा झाला तालिबान?
२०१२ मध्ये नाटो तळावर हल्ला केला. २०१५ मध्ये कुंडुजवर ताबा मिळवून तालिबानने परतीचे संकेत दिले. एप्रिलमध्ये अमेरिकी सैन्य परतण्याची घोषणा हाेताच तालिबानने आघाडी उघडली. २० वर्षांत ६१ लाख कोटी रु. खर्च करूनही अमेरिकेचे हात रिकामे आहेत.

बातम्या आणखी आहेत...