आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:चीनमध्ये शाळा-कॉलेज, सिनेमागृह खुले, बीजिंगमध्ये परदेशींच्या थेट प्रवेशावर बंदी, लोक कामावर परतले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनने संसर्गात केली घट, अर्थव्यवस्था खुली, आता कोरोनासोबत जगण्याचे ‘न्यू नॉर्मल’

बीजिंगहून भास्करसाठी रूपेश केडिया
कोरोनाच्या संसर्गामुळे भलेही चीनवर जगभरातून आरोप केले जात असतील. परंतु काेरोनाच्या काळात केवळ चीनमध्येच आर्थिक व्यवहार आणि सामान्य जनजीवन सुरळीत झाले आहे. उर्वरित जगात काही ठिकाणी मजुरांचा तुटवडा तर कुठे जागतिक मागणीत घट आहे. परंतु चीनमधील कारखाने पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहेत. जगभरात वर्क फ्रॉम होम आता न्यू नॉर्मल झाले असताना चीनमध्ये मात्र कार्यालयांत संपूर्ण कर्मचारी वर्ग नव्या जोमाने व्यग्र झाल्याचे दिसते. सार्वजनिक वाहन व्यवस्था सुरू झाली. शाळा-महाविद्यालये उघडली. चीनची राजधानी बीजिंगमधील सद्य:स्थिती व त्यामागील कारणांचा हा ग्राउंड रिपोर्ट....

बीजिंग : दोन महिन्यांपासून बंद असलेला ठोक बाजार सुरू
शाळा : बालवाडी- महाविद्यालयापर्यंत खुले

संपूर्ण चीनमध्ये केजीपासून कॉलेजपर्यंत सर्व काही सुरू झाले आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे. केवळ परदेशी विद्यार्थी असलेल्या उच्च शिक्षण संस्था अद्याप सुरू होणे बाकी आहे.

कार्यालय : सॅनिटायझेशनसाठी यूव्ही गेट कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझेशनसाठी यूव्ही किरणांची सुविधा असलेले गेट लावले आहेत. प्रकृती बिघडल्यास कर्मचाऱ्यांना तत्काळ सुटी दिली जाते.

बाजारपेठ : आधी ३५, आता ८५ टक्के मास्क
बीजिंगचा ठोक बाजार दोन महिन्यांनंतर आता सुरू झाला आहे. महामारीमध्ये आधी ३० ते ३५ टक्के लोक मास्क घालत होते. आता ८० ते ८५ टक्के लोक मास्क घालतात. रोकड व्यवहार जवळपास संपुष्टात आला

परिवहन : प्रवेशासाठी निगेटिव्ह प्रमाणपत्र
सार्वजनिक परिवहन, आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत. ३६ युरोपीय, १३ आशियाई देशातील नागरिक येऊ शकतात. दर पाच दिवसांपूर्वी जारी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य मानले जाते.

बीजिंग : येण्यापूर्वी इतर शहरात क्वाॅरंटाइन
चीनसोबत करार असलेल्या देशांतील प्रवाशांना ४८ तास, इतरांना १४ दिवसांसाठी क्वाॅरंटाइन राहावे लागते. बीजिंगला येण्यापूर्वी इतर १६ विमानतळांपैकी एखाद्या ठिकाणी उतरावे लागते. क्वाॅरंटाइन पूर्ण झाल्यानंतर बीजिंगमध्ये प्रवेश मिळू शकतो.

उद्योग : पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू
चीनमध्ये सुरू झालेल्या कारखान्यांत मजुरांचा तुटवडा मुळीच नाही. जागतिक बाजारात मागणीत घट झाल्याने प्रत्येक क्षेत्रातील मजुरांच्या संख्येत घट झाली आहे. सरकारने उद्योगांना पूर्ण क्षमतेने व नवीन बाजारपेठ शोधण्यास सांगितले आहे. २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत घसरण होती. आता सुधारणा दिसते.

नियंत्रण : २००३ चा सार्सचा अनुभव पाठीशी
- २००३ मधील सार्स विषाणूशी लढ्याचा चीन अधिकाऱ्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरला. कोविड-१९ व सार्सचा ७५ टक्के जिनोम समान आहे.
- चीनमध्ये सरकारचे नियंत्रण कडक आहे. येथे सरकारने लागू केलेले निर्बंध मोडण्याचा प्रश्नच येत नाही. लोक त्याचे शंभर टक्के पालन करतात.
- टेस्टिंग किट्सपासून व्हेंटिलेटरसारख्या आरोग्य उपकरणांचा पुरवठा चीन जगभरात करतो. त्यामुळे देशात पुरेशा आरोग्यविषयक सुविधा आहेत.

भारत-चीन संबंध : व्यापाऱ्यांत तणाव नाही
भारत-चीन यांच्यातील तणावाबद्दल लोकांमध्ये चर्चा दिसून येते. परंतु भारतीय आणि चिनी व्यापाऱ्यांत त्याचा तणाव नाही. चीनमध्ये सामान्य जनतेला सरकारच्या निर्णयांवर बोलण्याचे स्वातंत्र्य नाही.