आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Schools Should Emphasize Character Building, Not Just Math And Science Subjects; 77 Percent Of Parents Vote

शिक्षणाचे सूत्र:शाळांनी गणित-विज्ञान विषयच नव्हे, तर चारित्र्य निर्मितीवरही भर द्यावा; 77 टक्के पालकांचे मत

न्यूयॉर्क4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञान-तंत्रज्ञान, गणित,अभियांत्रिकी यापेक्षा वेगळ्या विषयांचे आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावे, अशी अनेक आई-वडिलांची भावना असते. अशा वेगळ्या विषयातून मुलांचे चरित्र घडावे, असे त्यांना वाटत असते. अमेरिकेत दोन हजार पालकांच्या पाहणीत ७७ टक्के म्हणाले, प्राथमिक शिक्षणाच्या काळात शैक्षणिक कौशल्यासोबतच चारित्र्य संवर्धनाचे शिक्षणही दिले जावे.

मुलांना आैपचारिक शिक्षणासोबतच मानवी संबंध, सामाजिकतेबद्दल माहिती असावी, असे ७७ टक्के पालकांना वाटते. इतरांना मदत करण्याचे महत्त्व मुलांना समजावे असेही मत ७५ टक्के पालकांनी व्यक्त केले. शाळेतून मुलांना जबाबदारी, मदत, प्रामाणिकपणा, न्यायप्रिय होणे इत्यादीचे धडेही मिळायला हवेत. अशा प्रकारच्या चारित्र्य निर्माण करणाऱ्या मुल्यांचे धडे आमच्या काळात अभ्यासक्रमाचा भाग हवे होते, असे मत तीनपैकी दोन पालकांनी व्यक्त केले.

७५ टक्के पालकांनी आपल्या पाल्यांसाठी चारित्र्य निर्माण करणाऱ्या शाळांची निवड केल्याचे या पाहणीतून दिसून आले. जीवनाच्या सुरुवातीलाच असे मूल्य शिक्षण दिल्यास हे जग जगण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले ठिकाण होईल. शाळेतून या दिशेने प्रयत्न व्हावेत. आपली मुले इतरांचे सांत्वन करताना किंवा आपली खेळणी इतरांना देत असल्याचे बघून ६१ टक्के पालकांना आपल्या मुलांचे योग्य चारित्र्य निर्माण होत असल्याचे वाटल

मुलांना बाहेरचे जग दाखवावे पाहणीतील तीन चतुर्थांश पालक म्हणाले, मुलांना अनेकदा वर्गाबाहेरही खूप काही शिकण्याच्या संधी मिळतात. ५२ टक्के पालक म्हणाले, समाजसेवेसाठी आमची मुले परिपक्व झाली आहेत. त्यापैकी बहुतांश म्हणाले आमच्या मुलांसोबत आम्हालाही सेवा करावी वाटते.

बातम्या आणखी आहेत...