आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रान्समध्ये दक्षिण पर्वतीय भागात जगभरातील स्वच्छ व नितळ ऊर्जास्रोत मिळवण्यासाठी ही कवायत सुरू आहे. यात भारतासह ३५ देशांचे शास्त्रज्ञ सहभागी झालेत. हा सूर्य तयार होईल तेव्हा मानवी इतिहासातील ऊर्जेचे सर्वात मोठे संकट संपेल. सोबतच हवामान बदलाचा सामना करणाऱ्या पृथ्वीलाही या संकटातून मुक्ती मिळेल. याच्या माध्यमातून केवळ १ ग्रॅम अणुइंंधनापासून ८ टन तेलाइतक्या ऊर्जेची निर्मिती केली जाईल. हे शास्त्रज्ञ अणुसंलयावर आपले प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,
अणुसंलयन प्रक्रियेवर काम : अणुसंलयन प्रक्रिया खरा सूर्य आणि इतर ताऱ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या होते. तथापि, ही प्रक्रिया पृथ्वीवर पुन्हा होणे सोपे नाही. अणुसंलयनाच्या माध्यमातून जीवाश्म इंधनाच्या विपरीत अमर्याद ऊर्जा मिळते. यामध्ये थोडाही ग्रीन हाऊस गॅस निघत नाही. यामुळे रेडिओ अॅक्टिव्ह कचऱ्यापासूनही मुक्ती मिळण्याची अपेक्षा आहे.
१९८५ मध्ये पहिल्यांदा सुचली होती कल्पना : फ्रान्सचे आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लिअर प्रायोगिक रिअॅक्टर (आयटीईआर) हे दीर्घकाळ फ्यूजन रिअॅक्शन जारी ठेवणारे पहिले उपकरण असेल. यात इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी व मटेरियलची टेस्ट केली जाईल. त्याचा वापर फ्यूजनवर आधारित विजेच्या व्यावसायिक उत्पादनासाठी केला जाईल. याची कल्पना पहिल्यांदा १९८५ मध्ये सुचली होती. याची डिझाइन बनवण्यात भारत, जपान, कोरिया, युरोपियन युनियन, अमेरिकेची महत्त्वाची भूमिका आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.