आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅक्सिन अपडेट:रशिया व अॅस्ट्राझेनेकाचे वैज्ञानिक आता दोन्ही लसींच्या मिश्रणाची करणार चाचणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्टीफन क्रॅव्हचेंको

कोरोनाविरुद्धच्या लसीची क्षमता वाढवण्यासाठी जगातील दोन संस्थांनी हातमिळवणी केली आहे. रशियन प्रत्यक्ष गुंतवणूक निधी संस्थेने शुक्रवारी सांगितले, ‘अॅस्ट्राझेनेकाने स्पुटनिक-५ लसीच्या दोन घटकांपैकी एकाचा वापर करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. चाचणीसाठी स्पुटनिक-५ च्या ह्यूमन अॅडेनोव्हायरल व्हेक्टर टाइप अॅड २६ च्या मिश्रणाचा वापर होईल. या चाचणीद्वारे वैज्ञानिक लसीच्या क्षमता वाढवण्याच्या शक्यतेवर अभ्यास करतील.”

व्हॅक्सिन अपडेट : संयुक्त चाचणी का होतेय?
- दाेन लसींच्या मिश्रणातून रोगप्रतिकारशक्ती वाढते?

वैज्ञानिकांची दोन लसींच्या मिश्रणातून रोगाशी लढण्याची क्षमता वाढते का, हे पाहण्याची इच्छा आहे. कुठल्याही एका लसीच्या तुलनेत दोन लसींचे मिश्रण उत्तम व दीर्घकाळापर्यंत रोगप्रतिकारशक्ती देईल.

- केव्हा, कुठे, कुणावर टेस्ट?
रशियामध्येच १८ वर्षांवरील व्यक्तींवर चाचणी केली जाईल.

- दोन्ही लसी किती प्रभावी? अॅस्ट्राझेनेकाची ७० टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी आहे, स्पुटनिक- ५ च्या चाचण्या सुरू आहेत. याआधी ती ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser