आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Scientists Have Developed A Super Enzyme That Decomposes Plastics 6 Times Faster, Which Will Be Widely Used As The Cost Is Reduced.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:प्लास्टिकचे 6 पट वेगाने विघटन करणारे सुपर एंझाइम वैज्ञानिकांनी तयार केले, खर्च कमी येत असल्याने मोठ्या प्रमाणावर वापर होईल

इसाबेला क्वाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगात दरवर्षी 36 कोटी टन प्लास्टिकची निर्मिती होते, 15 कोटी टन जमिनीवरच पडून राहते

अमेरिका आणि ब्रिटनमधील वैज्ञानिकांच्या चमूने एक सुपर एंझाइम (सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य) तयार केले आहे. ते प्लास्टिकपासून बनवलेल्या प्रत्येक प्रकारच्या बाटल्यांचे विघटन करण्यासाठी वापरले जाईल. त्यामुळे प्लास्टिकसारखा कडक पदार्थ सहापट जास्त वेगाने विघटित केला जाईल. या प्रक्रियेसाठी लागणारी गुंतवणूक खूपच कमी असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वापरले जाईल. या शोधामुळे प्लास्टिक प्रदूषणाच्या संकटाला तोंड देण्यास मोठे यश मिळेल.

वॉशिंग्टन विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक जिम फेंडनर यांच्या मते, हा खरोखरच उत्साहवर्धक प्रयोग आहे. त्याचे कारण म्हणजे दरवर्षी सुमारे ३६ कोटी टन प्लास्टिक जगभरात तयार होते. त्यापैकी तब्बल १५ टन प्लास्टिक जमिनीवरच पडून राहते.

यातील सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे, समुद्रातही प्लास्टिक ४५० वर्षे आहे त्या अवस्थेतच पडून राहू शकते आणि मायक्रोप्लास्टिकच्या रूपात त्याचे विघटन होऊन ते पाण्यात मासे आणि इतर जीवजंतूंमार्फत माणसांच्या शरीरात प्रवेश करते. त्यामुळे मानवाला अनेक प्रकारचे गंभीर आजार होत असून आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.

ब्रिटनच्या सेंटर फॉर एंझाइम इनोव्हेशनचे संचालक प्राध्यापक जॉन मॅकहिगन यांच्या मते, सुपर एंझाइम काही दिवसांतच प्लास्टिकला त्याच्या मूळ सामग्रीत बदलण्यास किंवा ब्लॉक बनवण्यास सक्षम आहे. हे एंझाइम एका विशिष्ट प्रकारच्या जिवाणूपासून तयार होते. एवढे करूनही प्लास्टिकचे उत्पादन कमी झाले नाही तर प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण पुढील २० वर्षांत तब्बल तिप्पट होऊ शकते. त्यामुळे मानवाला असलेला धोका वाढू शकतो.

कसे तयार झाले सुपर एंझाइम

२०१६ मध्ये जपानमध्ये जिवाणूंपासून दोन प्रकारचे एंझाइम्स मिळवण्यात आले. त्यापैकी एक एंझाइम प्लास्टिकचे विघटन करण्यात पूर्णपणे यशस्वी ठरले. पण २०१८ मध्ये वैज्ञानिकांनी दोन्ही एंझाइम्सचा एकत्रित वापर केला तेव्हा त्याच्या विघटनाचा वेग ६ पट वाढला.

जगात दर मिनिटाला खरेदी केल्या जातात पाण्याच्या १० लाख बाटल्या

जगभरात दर मिनिटाला पाण्याच्या प्लास्टिकच्या १० लाख बाटल्या विकतात. दरवर्षी ५ लाख कोटी सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. प्लास्टिकच्या एकूण उत्पादनांपैकी अर्धे एकदाच वापरले जाते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser